Stocks in focus today : आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार झोमॅटो, हिरो मोटोकॉर्प, गोदरेज प्रॉपर्टीज, आरआयएल आणि नायका या कंपन्यांच्या शेअर्सवर नजर ठेवू शकतात. आज हे शेअर्स चर्चेत असण्याची अनेक कारणे आहेत. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, बायोकॉन लिमिटेड आणि डीएलएफ लिमिटेडमध्ये खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
झोमॅटो : जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने झोमॅटोची टार्गेट प्राइस २७८ रुपयांवरून ३५५ रुपयांपर्यंत वाढवली आहे. झोमॅटोच्या क्विक कॉमर्स (क्यूसी) सेगमेंटवर विश्वास व्यक्त करत कंपनीने 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवले आहे.
हिरो मोटोकॉर्प : हिरो मोटोकॉर्पने सप्टेंबर तिमाहीत १०६६ कोटी रुपयांचा करोत्तर नफा कमावला आहे. या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न वाढून १०,४८३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ९,५३३ कोटी रुपये होते.
गोदरेज प्रॉपर्टीज : गोदरेज प्रॉपर्टीजने फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत. एका गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित ईडीच्या सुरू असलेल्या चौकशीला उत्तर देताना कंपनीने हे वक्तव्य केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज: आरआयएल, वायकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिस्ने कंपनीने त्यांचे विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. विलीनीकरणानंतरचा संयुक्त उपक्रम मूल्य ७०,३५२ कोटी रुपये आहे. भारतातील सर्वात मोठ्या मीडिया आणि मनोरंजन संस्थांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचं रिलायन्सचं उद्दिष्ट आहे.
नायका : आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत नायकाला १९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत २९ कोटी रुपये होता. वितरण मॉडेलमधील बदलांमुळे एकरकमी इन्व्हेंटरी सुधारणेमुळे ही घसरण झाली. या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न ७ टक्क्यांनी घटून ४६२ कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ४९६ कोटी रुपये होते.
इंडियन हॉटेल्स : हा शेअर ७४१ रुपयांत खरेदी करा, ७५० रुपयांचे लक्ष्य ठेवा आणि ७२५.२ रुपयांवर स्टॉप लॉस कायम ठेवा.
बायोकॉन लिमिटेड ३३५ रुपयांना खरेदी करून टार्गेट ३६० रुपये ठेवा. स्टॉपलॉस ३२० रुपये ठेवायला विसरू नका.
डीएलएफ लिमिटेड : हा शेअर ७६२ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ७८५ रुपये आणि स्टॉप लॉस ७४० रुपयांवर ठेवायला विसरू नका.