Smartphone Under 11000 : ११ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा मोटोरोलाचा ‘हा’ दमदार 5G फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphone Under 11000 : ११ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा मोटोरोलाचा ‘हा’ दमदार 5G फोन!

Smartphone Under 11000 : ११ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा मोटोरोलाचा ‘हा’ दमदार 5G फोन!

Nov 04, 2024 06:46 PM IST

Flipkart Festive Days Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह डेज सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट मिळत आहे.

११ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा मोटोरोलाचा ‘हा’ दमदार 5G फोन!
११ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा मोटोरोलाचा ‘हा’ दमदार 5G फोन!

Motorola 45 5G Offers And Deals: कमी किंमतीत सर्वोत्तम फीचर असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या स्मार्टफोन फेस्टिव्ह डेज सेलमध्ये ग्राहकांंना मोटोरोलाचा दमदार स्मार्टफोन मोटोरोला जी ४५ 5G ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकता. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही अ‍ॅक्सिस बँक किंवा आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्यास १ हजार रुपयांची सूट मिळेल. या ऑफरमुळे हा फोन ११ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. 

ग्राहकांकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ११ हजार ३०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. ही ऑफर ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टची अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

 मोटोरोला जी ४५ 5G: डिस्प्ले

या फोनमध्ये ७२०×१६०० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये देण्यात येणारा हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल ५०० निट्स आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ३ देखील मिळेल. 

मोटोरोला जी ४५ 5G: स्टोरेज आणि प्रोसेसर

हा फोन ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६ एस जेन ३ मिळेल.

मोटोरोला जी ४५ 5G: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये आपल्याला एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. यात ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. 

मोटोरोला जी ४५ 5G: बॅटरी

मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला ५००० एमएएच ची बॅटरी मिळेल. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

मोटोरोला जी ४५ 5G: कनेक्टिव्हिटी

बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फो न अँड्रॉइड १४ वर आधारित माययूएक्सवर काम करतो.

Whats_app_banner