Flipkart Sale: फ्लिपकार्टचा भन्नाट सेल; मोटोरोला जी६४ 5G फोन खरेदी करा आणखी स्वस्तात!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale: फ्लिपकार्टचा भन्नाट सेल; मोटोरोला जी६४ 5G फोन खरेदी करा आणखी स्वस्तात!

Flipkart Sale: फ्लिपकार्टचा भन्नाट सेल; मोटोरोला जी६४ 5G फोन खरेदी करा आणखी स्वस्तात!

Updated Jul 13, 2024 06:12 PM IST

Motorola G64 5G: फ्लिपकार्टवर मोटोरोला जी६४ 5G फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटवर मोठी सूट दिली जात आहे.

 मोटोरोला जी६४ 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी
मोटोरोला जी६४ 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Smartphone Under 15000: फ्लिपकार्टवर सुरू असेलल्या स्मार्टफोन सेलमध्ये मोटोरोला जी६४ ५जी स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली जा आहे.  मोटोरोला जी६४ ५जी च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे.  हा स्मार्टफोन एक हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. यासाठी ग्राहकांना अ‍ॅक्सिस किंवा एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेऊन ग्राहक ९ हजार २०० रुपयांची बचत करू शकतात.  एक्स्चेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 
मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि २४० हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट असलेला ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आले. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लासदेखील देत आहे. हा फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०२५ चिपसेट देत आहे.

मोटोरोला जी६४ 5G: कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये आपल्याला एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यात ५० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ६००० एमएएचची आहे. ही बॅटरी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोरोला जी६४ 5G: कनेक्टिव्हिटी

ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा मोटोरोला फोन अँड्रॉइड १४ वर काम करतो. कंपनी अँड्रॉइड १५ ओएस अपडेटही देणार आहे. डॉल्बी अ‍ॅटमॉस साऊंड असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळतील.

फ्लिपकार्टचा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सेल

फ्लिपकार्टने आपला जबरदस्त सेल ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सेलची घोषणा केली. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस आणि स्मार्टफोन्सवर सूट आणि डील मिळत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही फोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.

Whats_app_banner