Flipkart: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसच्या खरेदीवर थेट ३५ हजारांची सूट, फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसच्या खरेदीवर थेट ३५ हजारांची सूट, फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर!

Flipkart: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसच्या खरेदीवर थेट ३५ हजारांची सूट, फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर!

Dec 25, 2024 03:46 PM IST

Flipkart Sale: फ्लिपकार्टवर बहुचर्चित स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लस मोठ्या सवलतीसह उपलब्ध झाल आहे. त्यामुळे उत्कृष्ट कॅमेरा असलेला फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसच्या खरेदीवर थेट ३५ हजारांची सूट
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसच्या खरेदीवर थेट ३५ हजारांची सूट

Samsung Galaxy S24 Plus 5G Price Drop: दमदार कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने काही दिवसांंपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लस 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनने बाजारात दाखल होताच खळबळ उडवून दिली. या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या कॅमेऱ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सध्या ग्राहक सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस २४ प्लस 5G मोठ्या सवलतीत खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसच्या खरेदीवर थेट ३५ हजारांचे डिस्काऊंट मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लसमध्ये व्हॅनिला गॅलेक्सी एस २४ पेक्षा मोठा डिस्प्ले आहे. यात गॅलेक्सी एआय फीचर्स आहेत, ज्यामुळे इमेज एडिटिंगपासून टेक्स्ट फॉरमॅटिंगपर्यंतची कामे सोपी होतात. तसेच, या डिव्हाइसला ७ वर्षे अपडेट्स मिळत राहतील. यात वायरलेस चार्जिंगसारखे प्रीमियम फीचर्स देखील देण्यात आले आहेत. दमदार परफॉर्मन्ससाठी यात डेका-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लस 5G (१२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज) भारतीय बाजारात ९९ हजार ९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला. परंतु, आता फ्लिपकार्टवर ३५ हजार रुपयांच्या सवलतीनंतर तो ६४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे प्रभावी किंमत ६१ हजार ७४९ रुपये होईल. या फोनवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. जुना फोन एक्स्चेंज केल्यास ग्राहकांना ३६ हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंट मिळू शकतो, या डिस्काऊंटची किंमत जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबून असेल. हा फोन ऑनिक्स ब्लॅक आणि कोबाल्ट व्हायोलेट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७ इंचाचा क्यूएचडी+ डायनॅमिक अमोलेड २ एक्स डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्ससाठी एक्सीनॉस २४०० प्रोसेसरसह १२ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर गॅलेक्सी एस २४ प्लस 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपी प्रायमरी, १० एमपी टेलिफोटो आणि १२ एमपी अल्ट्रावाइड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४ हजार ९०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Whats_app_banner