iPhone 15 Plus: आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर १९ हजारांची सूट, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!-flipkart sale massive discount on iphone 15 plus ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone 15 Plus: आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर १९ हजारांची सूट, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!

iPhone 15 Plus: आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर १९ हजारांची सूट, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!

Aug 31, 2024 06:20 PM IST

Flipkart: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर थेट १९ हजारांची सूट दिली जात आहे.

आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर १९ हजारांची सूट
आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर १९ हजारांची सूट

iPhone: आयफोन १६ सीरिज लवकरच स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. आयफोन १६ सीरिज नेमके कोणत्या दिवसी लॉन्च होणार आहे आणि या मॉडेलची किंमत किती असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आली नाही.  मात्र, आयफोन १६ सीरिज लॉन्चिंगपूर्वी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आयफोन १५ प्लसच्या खरेदी थेट १९ हजार ६०१ रुपयांची सूट मिळत आहे. 

आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर सूट मिळवण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही बँक कार्डची गरज नाही किंवा कोणताही जुना फोन एक्स्चेंज करण्याची गरज नाही. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

आयफोन १५ प्लसचा १२८ जीबी व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर केवळ ६९ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, ही ऑफर फक्त पिवळ्या रंगाच्या आयफोन १५ प्लसवर उपलब्ध आहे. हा फोन  ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि पिंक या रंगात खरेदी करायचे असल्यास ग्राहकांना ७२ हजार ९९९ रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच आयफोन १५ प्लसचा पिवळ्या रंगाचा १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट खरेदी केल्यास त्याचा थेट फायदा १९ हजार ६०१ रुपये होईल. फोनची मूळ किंमत ८९ हजार ६०० रुपये आहे. फोनवर ५३ हजार ३५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील आहे. यासोबतच अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकतात.

iphone 15 plus at rs 19601 off
iphone 15 plus at rs 19601 off

आयफोन १५ प्लस: स्पेसिफिकेशन्स

आयफोन १५ प्लस दिसायला आयफोन १५ सारखेच आहे. परंतु स्टँडर्ड मॉडेलपेक्षा मोठ्या डिस्प्लेसह येतो. आयफोन १५ मध्ये ६.१ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. तर, आयफोन १५ प्लसमध्ये ६.७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पॅनेल आहे. प्लस मॉडेलमध्ये २७९६x१२९० पिक्सल रिझोल्यूशनचा सपोर्ट आहे. फोनमध्ये डायनॅमिक आयलंड, एचडीआर डिस्प्ले, २००० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस चा सपोर्ट आहे.

फोनचे वजन सुमारे २०१ ग्रॅम आहे. फोन वॉटरप्रूफ असून आयपी ६८ रेटिंगसह येतो. यात अ‍ॅपलची ए१६ बायोनिक चिप देण्यात आली आहे. फोनमध्ये अ‍ॅडव्हान्सड्युअल कॅमेरा सेटअप असून ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. हा कॅमेरा 4K व्हिडिओ शूट करण्यास सक्षम आहे. इमर्सिव्ह साउंड एक्सपीरियंससाठी फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात चार्जिंगसाठी टाइप- सी पोर्ट देण्यात आला आहे.

विभाग