Samsung Galaxy A05: सॅमसंगच्या लो बजेट फोन सॅमसंग गॅलेक्सी ए ०५ ला २०२४ मध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात, हा फोन टॉप-10 स्मार्टफोनच्या यादीत नुकताच आला आहे. दहा फोनच्या या लिस्टमध्ये हा फोन सर्वात स्वस्त फोन आहे. जर तुम्हालाही ८००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगला फोन खरेदी करायचा असेल तर हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये ग्राहकाला ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळते, जी दिर्घकाळ टिकते. फ्लिपकार्टवर हा फोन अवघ्या ७ हजार २८८ रुपयांत उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए०५ चा ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ७ हजार २८८ रुपयांना लिस्ट झाला आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. गॅलेक्सी ए०५ हा स्मार्टफोन ९ हजार ९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला. म्हणजेच हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास ग्राहकांना २ हजार ७११ रुपयांची बचत करता येऊ शकते.
गॅलेक्सी ए०५ मध्ये ६.७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन ७२०×१६०० पिक्सल आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी८५ चिपसेट कंपनी आहे. गॅलेक्सी ए०५ मध्ये ५००० एमएएच ची बॅटरी आहे जी २५ वॉट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर गॅलेक्सी ए०५ च्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. तर याच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्टोरेजला व्हर्च्युअल रॅमच्या माध्यमातून ६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. गॅलेक्सी ए ०५ सह, कंपनी ४ वर्षांचे सुरक्षा अपडेट आणि २ ऑपरेटिंग अपग्रेडचे आश्वासन देते. कनेक्टिव्हिटीसाठी ४जी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, ३.५ एमएम जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चा समावेश आहे. सॅमसंगचा हा फोन ब्लॅक, लाइट ग्रीन आणि सिल्वर या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे, या ऑफरसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
संबंधित बातम्या