Flipkart Sale: फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर! १२ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale: फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर! १२ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन

Flipkart Sale: फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर! १२ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन

Jan 14, 2025 04:25 PM IST

108 MP Camera Phone: फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोनवर धमाकेदार सूट मिळत आहे.

१२ हजारांमध्ये कमी किंमतीत खरेदी करा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन
१२ हजारांमध्ये कमी किंमतीत खरेदी करा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन

Smartphones Under 12000 : जर तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत बेस्ट रिअर कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर फ्लिपकार्टच्या मेमोरियल सेलमध्ये तुमच्यासाठी मोठी डील आहे. या डीलमध्ये तुम्ही बंपर ऑफरसह १०८ मेगापिक्सल मेन कॅमेरासह पोको एक्स ६ निओ 5G खरेदी करू शकता. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना १५०० रुपयांतपर्यंत बँक डिस्काऊंट मिळत आहे.  

जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन ११ हजार ४५० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. फ्लिपकार्टचा हा सेल १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

पोको एक्स ६ निओ 5G: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.६७ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १००० निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो.

पोको एक्स ६ निओ 5G: स्टोरेज

फोनमध्ये १२ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत यूएफएस २.२ स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये डायमेंसिटी ६०८० चिपसेट देत आहे.

पोको एक्स ६ निओ 5G: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये १०८ मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

पोको एक्स ६ निओ 5G: बॅटरी

फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड १३ वर आधारित एमआययूआय १४ वर काम करतो. या ऑफरसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तसेच हा फोन खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत ग्राहकांचे रिव्ह्यू एकदा पाहावेत.

Whats_app_banner