Flipkart Smart TVs Sale: जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल आणि बेस्ट डीलच्या शोधात असाल तर फ्लिपकार्टचा मेमोरिअल सेल तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये सॅमसंग, सोनी आणि शाओमी सारख्या कंपनींच्या ४३ इंच ते ६५ इंच स्मार्ट टीव्हीवर जोरदार डील दिली जात आहे. ऑफरमध्ये तुम्ही हे टीव्ही उत्तम बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय, या टीव्हीवर बंपर कॅशबॅक आणि एक्स्चेंज बोनसदेखील दिला जात आहे. लक्षात ठेवा की एक्स्चेंजमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या टीव्ही, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
१. सॅमसंग न्यू डी सीरिज ब्राइटर क्रिस्टल 4के व्हिजन प्रो (2024 आवृत्ती) 108 सेमी (43 इंच) अल्ट्रा एचडी (4के) एलईडी स्मार्ट टायझेन टीव्ही (UA43DUE76AKLXL)
या सॅमसंग टीव्हीची किंमत २९ हजार ४९० रुपये आहे. सेलमध्ये हा टीव्ही १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्संना हा टीव्ही ५ टक्के कॅशबॅकसह मिळू शकतो. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा स्मार्ट टीव्ही ११ हजार ३५० रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना अपस्केलिंगसह ५० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देत आहे. दमदार आवाजासाठी टीव्हीमध्ये २० वॅटचे साउंड आउटपुट देण्यात आले आहे.
५० इंच टीव्ही ४० हजार ९९० रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. सेलमध्येम हा टीव्ही १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्संना ५ टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे. तसेच टीव्हीवर ११ हजार ८५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील मिळत आहे. आयओटी सेन्सर आणि पॉवरफुल ब्राइटनेस असलेल्या या टीव्हीचे साउंड आउटपुट २० वॅट आहे.
सेलच्या शेवटच्या दिवशी हा टीव्ही सर्वोत्कृष्ट डीलमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीची किंमत ३६ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा टीव्ही १५०० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. टीव्ही खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. कंपनी टीव्हीवर ११ हजार ३५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील देत आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ऑडिओसोबत ३० वॅटचा स्पीकर आउटपुट मिळेल.
सोनी टीव्ही सेलमध्ये ७६ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये कंपनी या टीव्हीवर २००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्संना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी टीव्हीमध्ये ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देत आहे. दमदार आवाजासाठी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह २० वॅटचे साउंड आउटपुट देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या