Samsung Galaxy A35: फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy A35: फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध

Samsung Galaxy A35: फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध

Nov 11, 2024 11:24 PM IST

Samsung Galaxy A35 5G: सॅमसंग गॅलेक्सी ए३५ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध
फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध

सॅमसंगचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टच्या धांसू डीलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजचा लोकप्रिय फोन सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन ५ हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. या डिस्काऊंटसाठी तुम्हाला एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने पैसे द्यावे लागतील.

जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत २८ हजार ३०० रुपयांपर्यंत कमी करू शकता.  महत्त्वाचे म्हणजे, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात येणारा हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील मिळेल. 

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी: स्टोरेज

हा फोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये एक्सीनॉस १३८० चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी: कॅमेरा

या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये देण्यात येणारा मुख्य कॅमेरा ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी: कॅमेरा

 फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित वनयूआय ६.१ वर काम करेल.

Whats_app_banner