Massive Discount On Infinix Zero Flip 5G: इन्फिनिक्सचा पहिला फ्लिप फोन इनफिनिक्स झिरो फ्लिप आजपासून (२४ ऑक्टोबर २०२४) भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. जर तुम्हाला स्वस्तात चांगला फ्लिप फोन खरेदी करायचा असेल तर, हा फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये ६.९ इंचाचा मुख्य अमोलेड डिस्प्ले आणि ३.६४ इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये फोनच्या फ्रंटमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
इनफिनिक्स झिरो फ्लिपच्या ८ जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. सुरुवातीच्या बँक ऑफरसह हा फोन १ हजार ७५० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. झिरो फ्लिपची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरू झाली. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. या फोनवर एसबीआय क्रेडिट कार्डवर ७५० रुपये आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे ईएमआयवर १ हजार २५० रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनवर एक्स्चेंज ऑफरही मिळत आहे. परंतु, एक्स्चेंज ऑफर तुमच्या जुना फोनचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
इनफिनिक्स फ्लिपमध्ये ६.९ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये तुम्हाला इनर आणि आउटर अशा दोन्ही डिस्प्लेमध्ये एमोलेड पॅनेल देण्यात आले आहे. इनर डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह १४०० निट्सची पीक ब्राइटनेस आहे. आउटर डिस्प्लेचा आकार ३.६४ इंच आहे. परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेंसिटी ८०२० चिपसेट देण्यात आला आहे.
यामध्ये इनफिनिक्सने ८ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. विशेष म्हणजे, या फोनमध्ये कंपनीने ८ जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही दिला आहे. म्हणजेच यात तुम्हाला एकूण १६ जीबी रॅम मिळते.
फोटोग्राफीसाठी या फ्लिप फोनमध्ये ५० मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे असलेला ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फ्लिप स्मार्टफोनमधून तुम्ही 4के मोडवर ही रेकॉर्ड करू शकता. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यात ४ हजार ७०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ७० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.