Nothing Phone 2a: कार्ल पेई यांनी स्थापन केलेल्या टेक स्टार्टअप नथिंगने आपला नवीन स्मार्टफोन नथिंग फोन २ ए लॉन्च केला आहे. फ्लिपकार्टवर नथिंग २ ए स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन २३ हजार ९९९ रुपयांच्या मूळ किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. मात्र, हा स्मार्टफोन अवघ्या १९ हजार ९९९ रुपयांत मिळू शकतो.
द नथिंग फोन २ ए हा स्मार्टफोन तीन रंगात बाजारात दाखल झाला आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज जीबी आणि १२ जीबी रॅम/ २५६ स्टोरेज या तीन व्हेरिएंटसह बाजारात दाखल झाला. मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० प्रो प्रोसेसरसह संचालित फोन २ ए मध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा + ५० एमपी रियर कॅमेरा सेटअप, ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी, १२० हर्ट्झ फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले आणि अँड्रॉइड १४ वर आधारित नथिंग ओएस २.५ सारखे प्रभावी फीचर्स आहेत. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली, जी फुल चार्जवर दोन दिवसांपर्यंत चालते, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
द नथिंग फोन २ ए १२ मार्च २०२४ पासून फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि इतर आघाडीच्या आउटलेट्सवर उपलब्ध असेल. ऑनलाइन व्यवहारांसाठी एचडीएफसी कार्डवापरणाऱ्या ग्राहकांना २,००० रुपयांची तात्काळ सूट मिळू शकते. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्टवर ग्राहकांना अतिरिक्त २००० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल, ज्यामुळे ८ जीबी रॅम/१२८ जीबी व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन अवघ्या १९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.
संबंधित बातम्या