iPhone 16 Price Drop: आयफोन खरेदी करण्याचा इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन १६ अगदी स्वस्तात उपलब्ध झाला आहे. आयफोन १६ च्या खरेदीवर ग्राहकांना १० हजार रुपयांचा प्लॅट डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय, या फोनवर अनेक आकर्षक ऑफर देखील मिळत आहेत. या ऑफरसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अॅपलने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणेजच चार महिन्याआधी आयफोन १६ लॉन्च केला होता, या फोनच्या बॅक पॅनेलवर व्हर्टिकल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच हा फोन अॅपल इंटेलिजन्स म्हणजेच एआय फीचर्सला सपोर्ट करते. ज्यामुळे वापरकर्त्यांना टेक्स्ट फॉरमॅटिंग आणि इमेज एडिटिंग सारखी कामे सोप्या पद्धतीने करता येतात. या फोनमध्ये खास कॅमेरा अपग्रेडही देण्यात आले आहेत.
भारतीय बाजारात १२८ जीबी स्टोरेज असलेला आयफोन १६ चा बेस व्हेरियंट ७९ हजार ९०० रुपयांना आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर १० हजार रुपयांच्या सूटनंतर ६९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.
निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट किंवा ईएमआय व्यवहार करताना ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्जेंज ऑफर मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना ३८ हजार रुपयांची बचत करता येणार आहे. परंतु, ही सूट जुना फोन, ब्रँड आणि कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून असेल.
दमदार परफॉर्मन्ससाठी आयफोन १६ मध्ये ए १८ चिपसेट देण्यात आला असून या ६-कोर प्रोसेसरला बेस्ट मल्टी टास्किंगचा अनुभव मिळतो. डिव्हाइसमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेशना एक्सडीआर डिस्प्ले आहे आणि अॅपल इंटेलिजन्स फीचर्सला सपोर्ट करतो. यात बॅक पॅनेलवर ४८ एमपी प्रायमरी आणि १२ एमपी सेकंडरी सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १२ एमपी फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अनेक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात पांढरा, काळा, गुलाबी, अल्ट्रा-मरीन रंगाचा समावेश आहे. अॅपलने गेल्या वर्षी ९ सप्टेंबर २०२४ मध्ये आयफोन १६ सीरिज लॉन्च करण्यात आली होती. हा फोन बाजारात दाखल झाला. त्यावेळी तो खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी अॅपल स्टोअरसमोर गर्दी केली होती.
संबंधित बातम्या