Flipkart Month End Mobile Festival Sale: ओप्पोचा लेटेस्ट एंट्री लेव्हल मिलिटरी ग्रेड फोन फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाइल फेस्टिव्हल सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनला ही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन महिन्यांत ५ लाखांहून अधिक लोकांनी हा फोन खरेदी केला आहे. फोनमध्ये एमआयएल-एसटीडी-८१० एच सर्टिफिकेट मिळाले आहे, जेणेकरून फोन पाण्यात पडल्यास खराब होणार नाही. फोनमध्ये १२ जीबी रॅम (६ जीबी हार्डवेअर आणि ६ जीबी व्हर्च्युअल रॅम) मिळत आहे. या सेलमध्ये हा फोन १० हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
ओप्पो के१२एक्स फोनचे ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १२ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सध्या बँक डिस्काउंटनंतर १० हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. कॅनरा बँकेच्या क्रेडिट कार्डवर ही बँक सूट उपलब्ध आहे. या फोनवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे, ज्यामुळे ग्राहकांना ९००० पर्यंत बचत करता येऊ शकते. पण फोनच्या एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी किंमत फोनचा ब्रँड आणि स्थितीवर अवलंबून असेल. ओप्पो के१२ एक्स ब्रीज ब्लू आणि मिडनाइट व्हायोलेट रंगात उपलब्ध आहे. यासोबतच फोनवर ३ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयची ऑफर देखील आहे.
ओप्पो के१२ एक्समध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये आय कम्फर्ट मोड देखील देण्यात आला आहे. हा फोन ७.६८ एमएम अल्ट्रा स्लिम आहे. यात सेगमेंट-फर्स्ट स्प्लॅश टच टेक्नॉलॉजी आहे जी ओल्या हातांनी किंवा स्क्रीन ओल्या असतानाही टचस्क्रीनची सुविधा देते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ३२ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात पोर्ट्रेट, नाईट, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ, स्टिकर्स, टेक्स्ट स्कॅनर, स्लो मोशन, हाय रिझोल्यूशन असे अनेक कॅमेरा फीचर्स आहेत.
फोनमध्ये बॉक्समध्ये ४५ वॉट सुपरव्हीओसी चार्जरसह ५ हजार १०० एमएएच ची बॅटरी आहे. स्मार्टफोन ३० मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो.
ओप्पो के१२ एक्स 5G स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसरसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालतो आणि कलरओएस १४.०.१ वर आहे.
संबंधित बातम्या