मोटोरोलाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ३२ मेगापिक्सेलसेल्फी कॅमेरा असलेला कंपनीचा लोकप्रिय फोन - मोटोरोला एज ५० फ्युजनला मोठी पसंती मिळाली आहे. फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल्स बोनांझा सेल सुरू आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही हा फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे.
हा फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत २२ हजार २०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज स्थितीवर अवलंबून असेल. फोनमध्ये तुम्हाला १४४ हर्ट्झ कर्व्ड डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असलेले अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
कंपनी या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी+ पीओएलईडी कर्व्ह्ड डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल १६०० निट्स आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ५ ऑफर करत आहे.
फोनमध्ये १२ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज चा पर्याय देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून यात स्नॅपड्रॅगन ७ एस जेन २ आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये कंपनी एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देत आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनचा अल्ट्रावाइड कॅमेरा मॅक्रो लेन्स म्हणूनही काम करतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएच ची आहे, जी ६८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या मोबाइल्स बोनांझा सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स असलेले अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ऑफर फक्त मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध आहे.