Massive Discount On Samsung Galaxy S23 and Samsung S23 FE: दक्षिण कोरियातील स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने गेल्या वर्षी सॅमसंग गॅलेक्सी एस २३ आणि सॅमसंग एस २३ एफई हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले. या दोन्ही स्मार्टफोनला भारतात मोठी पसंती मिळली होती. फ्लिपकार्टवर सध्या सुरू असलेल्या फ्लॅगशिप सेल 2024 दरम्यान दोन्ही स्मार्टफोन्स मोठ्या सवलतीत विकले जात आहेत. ग्राहक बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटद्वारे अतिरिक्त कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही स्मार्टफोन एआय फीचर्स मिळत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ आणि सॅमसंग एस २३ एफई यापैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असेल.ट
कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस २३ हा स्मार्टफोन ७४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च केला होता. मात्र, आता हा फोन फ्लिपकार्टवर अवघ्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ (८ जबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोन ४४ हजार ९९९ रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या हा फोन ४९ हजार ९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन हँडसेट क्रीम, ग्रीन, लॅव्हेंडर आणि फँटम ब्लॅक शेड्समध्ये उपलब्ध आहे. अॅक्सिस बँकचे ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.
याशिवाय, ग्राहक कॉम्बो ऑफरमध्ये २००० आणि माय मोर सेव्ह मोरद्वारे १००० रुपयांची सूट मिळवू शकतात. या स्मार्टफोनच्या खेरदीवर ग्राहकांना एक्स्चेज ऑफर देखील मिळत आहे. एक्स्जेंज ऑफर अंतर्गत ग्राहक ४९ हजार रुपयेपर्यंत पैसे वाचवू शकतात.सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, ३ हजार ९०० एमएएचची बॅटरी, ट्रिपल सेटअप रिअर कॅमेरा (५० MP+ १०MP +१२MP) आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.
सॅमसंग एस २३ एफईची सुरुवातीची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ३३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे कॉम्बो ऑफरद्वारे तुम्ही ५ टक्के कॅशबॅक मिळवू शकतात.एक्स्चेंज ऑफरद्वारे ग्राहक ३७ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.