Flipkart News : फ्लिपकार्टवरून ग्राहकाने मागवला २२ हजाराचा स्मार्टफोन, मात्र बॉक्समध्ये मिळाले चक्क दगड-flipkart customer receives stones instead of rs 22 000 phone he ordered ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart News : फ्लिपकार्टवरून ग्राहकाने मागवला २२ हजाराचा स्मार्टफोन, मात्र बॉक्समध्ये मिळाले चक्क दगड

Flipkart News : फ्लिपकार्टवरून ग्राहकाने मागवला २२ हजाराचा स्मार्टफोन, मात्र बॉक्समध्ये मिळाले चक्क दगड

Mar 29, 2024 09:03 PM IST

गाझियाबादमधील व्यक्तीने दावा केला की, त्याने फ्लिपकार्टवरून २२ हजाराचा फोन ऑर्डर केला होता. मात्र त्याला पार्सलमध्ये दगड मिळाले.

फ्लिपकार्टच्या पार्सलमध्ये स्मार्टफोनऐवजी मिळाले दगड
फ्लिपकार्टच्या पार्सलमध्ये स्मार्टफोनऐवजी मिळाले दगड (X/@Abhishek_Patni)

गाझियाबादमधील एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवरून २२ हजाराचा स्मार्टफोन मागवला होता. मात्र त्याला बॉक्समध्ये चक्क दगड पॅकिंग करुन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने २८ मार्च रोजी ऑर्डर केली होती  व त्याच दिवशी त्याला डिलिव्हरी मिळाली. मात्र त्याला मोबाईल फोनचे अनबॉक्सिंग केल्यानंतर त्याला धक्काच बसला. बॉक्समध्ये छानपैकी दगड पॅकिंग केले होते. व्यक्तीने हे पार्सल परत करण्याचा प्रयत्न केला मात्र कंपनीने त्याची रिटर्न रिक्वेस्ट स्वीकारली नाही.

गाझियाबादमधील व्यक्तीने दावा केला की, त्याने फ्लिपकार्टवरून २२ हजाराचा फोन ऑर्डर केला होता. मात्र त्याला पार्सलमध्ये दगड मिळाले. व्यक्तीने सांगितले की, कुरिअर कंपनीने पार्सल परत घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

या व्यक्तीने शेअर केलेल्या स्त्रीनशॉटनुसार त्याने इन्फिनिक्स झिरो ३० ५ जी ( Infinix Zero 30 5G)  गोल्डन करलचा व २५६ जीबी स्टोरेजचा फोन ऑर्डर केला होता.

यानंतर फ्लिपकार्टने झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत म्हटले की, तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या विपरीत वस्तू तुम्हाला मिळाल्याबद्दल कंपनी दिलगिरी व्यक्त करते. याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी तुमचे ऑर्डर डिटेल्स पुरवा. तुमची माहिती गोपनीय ठेवली जाईल. आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो.

कंपनी ग्राहकांना सावध करते की, वस्तूंची बनावट विक्री करणाऱ्या सोशल मीडिया हँडलला प्रतिसाद देऊ नका. 

दरम्यान अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही. यापूर्वीह ग्राहकाना त्यांनी ऑर्डर केलेली वस्तू न मिळता दुसरीच वस्तू मिळाली आहे. नुकतेच काश्मीरमधील एका तरुणाने २०,८०८ रुपये किंमतीचा नथिंग कंपनीचा स्मार्ट फोन ऑर्डर केला होता मात्र त्याला I Kall कंपनीचा स्वस्तातली फिचर फोन मिळाला होता.

 

विभाग