Flipkart Black Friday Sale 2024: फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये जवळपास स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. दरम्यान, नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये सॅमसंगचा टीव्ही फक्त १५ हजार २४० रुपये आणि सोनीचा टीव्ही २३ हजार ९९० रुपयांना खरेदी करू शकतात. एवढेच नाहीतर, या सेलमध्ये दमदार डॉल्बी साऊंड असलेला टीव्ही फक्त १० हजार ९९९ रुपयांमध्ये तुमचा असू शकतो.
बेजल-लेस डिझाइन असलेला सॅमसंग ८० सेमी (३२ इंच) एचडी रेडी एलईडी स्मार्ट टायझेन टीव्ही १५ हजार २४० रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये या टीव्हीची किंमत १५०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरणाऱ्या ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना ३ हजार ५०० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. कंपनी टीव्हीमध्ये हायपर रिअल पिक्चर इंजिनसह ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देत आहे. दमदार साउंडसाठी कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल प्लससोबत २० वॅटचे स्पीकर देत आहे.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये सोनी ८० सेमी (३२ इंच) एचडी रेडी एलईडी स्मार्ट गुगल टीव्ही २०२४ एडिशन (केडी-३ डब्ल्यू ८२५) हा गुगल टीव्ही २३ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. बँक ऑफरमध्ये टीव्हीवर १५०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना टीव्हीवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या टीव्हीची किंमत ३५०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. कंपनी या टीव्हीमध्ये एक्स-रिअॅलिटी प्रोसह शानदार एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. दमदार साउंडसाठी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ देखील मिळतो.
डॉल्बी ऑडिओसह येणाऱ्या डायवा ८० सेमी (३२ इंच) एचडी रेडी एलईडी स्मार्ट वेबओएस टीव्ही २०२४ एडिशन (D32H3WOS) टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये १० हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. या टीव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. इतर टीव्हीप्रमाणे या टीव्हीवरही ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. कॅशबॅकसाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डने पैसे द्यावे लागतील. एक्स्चेंज ऑफरमध्ये टीव्हीवर ३५०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या टीव्हीमध्ये तुम्हाला ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळेल. टीव्हीमध्ये दिलेला स्पीकर सेटअप २० वॅटचा आहे.