Flipkart Sale: तगडे फीचर्स असलेल्या मोटोरोला एज ५० निओ पुन्हा झाला स्वस्त, फ्लिपकार्टची खास ऑफर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale: तगडे फीचर्स असलेल्या मोटोरोला एज ५० निओ पुन्हा झाला स्वस्त, फ्लिपकार्टची खास ऑफर!

Flipkart Sale: तगडे फीचर्स असलेल्या मोटोरोला एज ५० निओ पुन्हा झाला स्वस्त, फ्लिपकार्टची खास ऑफर!

Nov 26, 2024 11:31 PM IST

flipkart black friday sale 2024: फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये मोटोरोला एज ५० निओ अगदी स्वस्तात उपलब्ध झाला आहे.

 तगडे फीचर्स असलेल्या मोटोरोला एज ५० निओ पुन्हा झाला स्वस्त
तगडे फीचर्स असलेल्या मोटोरोला एज ५० निओ पुन्हा झाला स्वस्त

Motorola Edge 50 Neo Price Drop: जर तुम्ही २० ते २५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर मोटोरोला एज ५० निओ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये कंपनीचा हा फोन बेस्ट ऑफर्ससह उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन २५०० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सवलतीसाठी तुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय व्यवहार करावे लागतील.

फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी कमी करू शकता. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. फ्लिपकार्टचा हा सेल २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मोटो एज ५० निओ: डिस्प्ले
कंपनी या फोनमध्ये ६.४ इंचाचा फ्लॅट एलटीपीओ पीओएलईडी डिस्प्ले देत आहे. 1.5K रिझोल्यूशन असलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. फोनवर देण्यात येत असलेल्या या डिस्प्लेमध्ये तुम्हाला ३००० निट्सची पीक ब्राइटनेस लेव्हल पाहायला मिळणार आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ऑफर करत आहे.

मोटो एज ५० निओ: स्टोरेज

फोनमध्ये ८ जीबी एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये डायमेंसिटी ७३०० चिपसेट ऑफर करत आहे.

मोटो एज ५० निओ: कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मेन लेन्स आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्ससह १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ओआयएससह येतो आणि टेलिफोटो कॅमेरा 3 एक्स ऑप्टिकल झूमसह येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

मोटो एज ५० निओ: बॅटरी

फोनला पॉवर देण्यासाठी ४३१० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ६८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड १४ वर काम करतो. दमदार साउंड एक्सपीरियंससाठी तुम्हाला डॉल्बी अॅटमॉससोबत स्टीरिओ स्पीकर्स मिळतील.

Whats_app_banner