Flipkart Big Upgrade Sale : सहा हजारात स्मार्ट टीव्ही अन् साडेसात हजारांत वॉशिंग मशीन! फ्लिपकार्टवर जबरदस्त सेल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Big Upgrade Sale : सहा हजारात स्मार्ट टीव्ही अन् साडेसात हजारांत वॉशिंग मशीन! फ्लिपकार्टवर जबरदस्त सेल

Flipkart Big Upgrade Sale : सहा हजारात स्मार्ट टीव्ही अन् साडेसात हजारांत वॉशिंग मशीन! फ्लिपकार्टवर जबरदस्त सेल

Mar 09, 2024 04:54 PM IST

Flipkart Big Upgrade Sale News : फ्लिपकार्टवर बिग अपग्रेड सेल सुरू झाला असून स्मार्ट टीव्ही व वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे.

सहा हजारात स्मार्ट टीव्ही अन् साडेसात हजारांत वॉशिंग मशीन! फ्लिपकार्टवर खास सेल
सहा हजारात स्मार्ट टीव्ही अन् साडेसात हजारांत वॉशिंग मशीन! फ्लिपकार्टवर खास सेल

Flipkart Big Upgrade Sale : नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून फ्लिपकार्टवर बिग अपग्रेड सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये थॉमसनच्या (thomson) २४ ते ७५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर (Smart TV) बंपर सूट आणि ऑफर आहे. या सगळ्या सवलतीनंतर हा टीव्ही अवघ्या ५,९९९ रुपयांना मिळणार आहे.

फ्लिपकार्टच्या बिग अपग्रेड सेलमध्ये टीव्ही बरोबरच थॉमसन वॉशिंग मशिनही (Washing Machine) स्वस्त दरात उपलब्ध आहे. सेलमध्ये सर्वात स्वस्त वॉशिंग मशीन ७,५९० रुपयांपर्यंत मिळत आहे. टीव्ही किंवा वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी Axis Bank कार्डद्वारे पैसे भरल्यास १० टक्के अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. येत्या १५ मार्चपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. सेलमध्ये थॉमसनच्या उत्पादनांवर कोणकोणत्या सवलती आहेत. जाणून घेऊया…

२४ ते ५० इंच टीव्ही

थॉमसनचा २४ इंचाचा 24TM2490 टीव्ही सवलतीनंतर केवळ ५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ३२ इंचाचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मॉडेल क्रमांक 32ALPHA007BL तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्याची किंमत ८,९९९ रुपये आहे, परंतु सेलमध्ये तो ८,२९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. कंपनी आपला ४० इंचाचा 40RT1033 टीव्ही १५,९९९ रुपयांऐवजी १४,९९९ रुपयांना देत आहे. तर, थॉमसनचा ४३ इंचाचा टीव्ही (मॉडेल क्रमांक 43PATH4545BL) डिस्काउंटनंतर १९,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही ५० इंची टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर 50OPMAXGT9020 हे मॉडेल पाहू शकता. या टीव्हीची किंमत २६,९९९ रुपये आहे. सवलतीनंतर हा टीव्ही २४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

५५ ते ७५ इंच मॉडेल्सवर मोठ्या ऑफर्स

फ्लिपकार्टच्या बिग अपग्रेड सेलमध्ये ५५ इंची 55 OP MAX9055 टीव्ही २७,९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत २९,९९९ रुपये आहे. याशिवाय, 55PATH5050BL हे मॉडेल २८,९९९ रुपयांऐवजी २७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे ६५ इंची 65OPMAX9033 थॉमसन टीव्ही ४५,९९९ रुपयांऐवजी ४१,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. ७५ इंची OATHPRO2121 टीव्ही ८४,९९९ रुपयांऐवजी ७७,९९९ रुपयांना मिळू शकतो.

वॉशिंग मशिनवरही खास सवलत

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड TSA7000SP वॉशिंग मशीन ७,९९९ रुपयांऐवजी ७५९० रुपयांना उपलब्ध आहे. तर, मॉडेल नंबर TSA8500SPG सह सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याची मूळ किंमत १०,४९९ रुपये आहे.

पूर्णपणे स्वयंचलित टॉप-लोड वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यात मोठ्या ऑफर्स आहेत. मॉडेल क्रमांक TTL7000S सह पूर्णपणे स्वयंचलित टॉप लोड वॉशिंग मशीन ११,४९९ रुपयांऐवजी ११,३९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मॉडेल क्रमांक TTL1000S असलेले वॉशिंग मशीन १४,९९९ रुपयांऐवजी १४,७९९ रुपयांना मिळेल.

Whats_app_banner