Smartphones Under 11000: फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग सेलिब्रेशन सेलची मुदत वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहक अजूनही टॉप कंपन्यांचे फोन बेस्ट डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे. या सेलमध्ये ११ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या तीन शानदार फोनबद्दल जाणून घेऊयात.
फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहक विवो टी३ लाइट 5G, मोटोरोला जी ४५ 5G आणि सॅमसंग गॅलेक्सी ए१४ 5G डिव्हाइस बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्स्चेंज बोनससोबत खरेदी करू शकतात. लक्षात ठेवा की, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला विवो टी३ लाइट 5G
सेलमध्ये १० हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. डीलमध्ये दिल्या जाणाऱ्या बँक ऑफरमध्ये हा फोन १ हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड धारकांना ५ टक्के कॅशबॅक मिळत असेल. याशिवाय, सेलमध्ये सर्व बँक कार्डवर ६२५ रुपयांची सूट ही दिली जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन ८ हजार ४५० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. विवोच्या या फोनमध्ये ग्राहकांना ६.५६ इंचाचा डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून कंपनी डायमेंसिटी ६३०० चिपसेट देत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मोटोरोला जी ४५ 5G
सेलमध्ये ९ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांनी हा फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड वापर केला. तर, तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये फोनवर ८ हजार ५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये कंपनी फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देत आहे, हा फोन अँड्रॉइड १४ ओएसवर काम करतो.
फ्लिपकार्ट बिग शॉपिंग फेस्टिव्हलच्या एक्सटेंडेड ऑफर्समध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. हा फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहक हा फोन ८ हजार ८५० रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन एक्सीनिस १३३० प्रोसेसरवर काम करतो.
संबंधित बातम्या