८ जीबी रॅम आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंग असलेला 5G फोन झाला स्वस्त, १३ नोव्हेंबरपर्यंत जबरदस्त डील!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ८ जीबी रॅम आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंग असलेला 5G फोन झाला स्वस्त, १३ नोव्हेंबरपर्यंत जबरदस्त डील!

८ जीबी रॅम आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंग असलेला 5G फोन झाला स्वस्त, १३ नोव्हेंबरपर्यंत जबरदस्त डील!

Nov 09, 2024 05:36 PM IST

Flipkart Big Savings Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर भरघोस सूट मिळत आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर भरघोस सूट
फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर भरघोस सूट

Massive Discount on Realme P1 5G: १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये चांगली ऑफर आहे. या सेलमध्ये ग्राहक रियलमी पी १ 5G (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज) व्हेरिएंट बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकतात. फोनच्या या व्हेरियंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर ग्राहकांना १ हजार ५०० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड असलेल्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. 

या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना १५ हजार २५० रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकतो.  एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. हा बंपर सेल १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

रियलमी पी १ 5G: डिस्प्ले 

कंपनी या फोनमध्ये २४००x१०८० पिक्सल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देत आहे. हा रेनवॉटर स्मार्ट टच डिस्प्ले १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि २००० नाइट्सची पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. 

रियलमी पी १ 5G: स्टोरेज

फोनमध्ये ८ जीबीपर्यंत एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे आहेत.

रियलमी पी १ 5G: कॅमेरा

रियलमी पी १ 5G मध्ये ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

रियलमी पी १ 5G: बॅटरी

 रियलमीच्या या फोनमध्ये तुम्हाला ५००० एमएएच ची बॅटरी मिळेल. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ४५ वॅट सुपरव्हीओसी चार्जिंगला सपोर्ट करते. 

रियलमी पी १ 5G: कनेक्टिव्हिटी

बायोमेट्रिक सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५.० वर काम करतो.

Whats_app_banner