Flipkart Sale : १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या फोनवर ५ सप्टेंबरपर्यंत जबरदस्त ऑफर!-flipkart big savings days sale massive discount on infinix gt 20 pro ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale : १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या फोनवर ५ सप्टेंबरपर्यंत जबरदस्त ऑफर!

Flipkart Sale : १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या फोनवर ५ सप्टेंबरपर्यंत जबरदस्त ऑफर!

Sep 04, 2024 10:54 PM IST

Flipkart's Big Savings Days Sale: फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये इनफिनिक्स जीटी 20 प्रो स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट देत आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना १०८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.

फ्लिपकार्टवर १०८ मेगापिक्सल असलेल्या स्मार्टफोनवर मोठी सूट
फ्लिपकार्टवर १०८ मेगापिक्सल असलेल्या स्मार्टफोनवर मोठी सूट

Infinix GT 20 Pro: सर्वोत्तम कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेलअंतर्गत इन्फिनिक्स कंपनीचा जीटी २० प्रो स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना १०८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा मिळत आहे. 

फ्लिपकार्टवर इन्फिनिक्सच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही हा फोन ३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. 

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना कंपनी ५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत १७ हजार ६०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा सेल ५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

इन्फिनिक्स जीटी २० प्रो: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये १०८०×२४३६ पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.७८ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा एलटीपीएस एमोलेड डिस्प्ले 144 हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये देण्यात येणाऱ्या या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल १३०० निट्स आहे.

इन्फिनिक्स जीटी २० प्रो: स्टोरेज

फोनमध्ये १२ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ५एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८२०० अल्टिमेट चिपसेट देत आहे.

इन्फिनिक्स जीटी २० प्रो: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी च्या या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे मिळतील. यामध्ये १०८ मेगापिक्सेलच्या मेन लेन्ससह २ मेगापिक्सलच्या दोन कॅमेऱ्यांचा समावेश आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ओआयएस फीचरसोबत येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

इन्फिनिक्स जीटी २० प्रो: बॅटरी

फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएच ची आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड १४ वर आधारित एक्सओएस १४ वर काम करतो.

विभाग