50 MP Camera Smartphone Under 7000: दसरा आणि दिवाळी सेलमध्ये चांगल्या ऑफर्सचा फायदा घेऊ न शकलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सेल संपल्यानंतर आता बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. दरम्यान, ७ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सेल १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे.
बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी या सेलमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या फ्लिपकार्ट बिग डेज सेलमध्ये दोन बजेट स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यांचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असून त्यांची किंमत ८ हजारांपेक्षा कमी आहे. याशिवाय, या फोनवर कॅशबॅकही मिळत आहे.
रेडमी १३ सी ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ७ हजार १९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. ग्राहक हा फोन आकर्षक ईएमआयवरही खरेदी करू शकतात.
या फोनमध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास देखील देत आहेत. हा फोन मीडियाटेक हेलियो जी ८५ प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देत आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
पोको सी६५ ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन ५ टक्के कॅशबॅकसह उपलब्ध आहे. या कॅशबॅकसाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट करावे लागेल. हा फोन २४७ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर खरेदी करता येईल.
या फोनमध्ये कंपनी ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा फोन मीडियाटेक हेलियो जी८५ प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये ५० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह लेन्ससह २ मेगापिक्सल एआय लेन्सचा समावेश आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.