Smartphones Under 15000: फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेलला आजपासून सुरुवात झाली असून या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली. आजपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये सॅमसंग आणि मोटोरोला कंपनीचा 5G फोन १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक दिला जात आहे.
या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील दिली जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैशांची बचत करता येऊ शकते. परंतु, एक्सचेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा सेल ७ जुलैपर्यंत चालणार आहे.
मोटोरोला जी ६४ 5G च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन एक हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या डिस्काऊंटसाठी अॅक्सिस, कोटक, एचडीएफसी बँक किंवा एसबीआयच्या कार्डने पेमेंट करावे लागेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डधारकांना ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे. इजी ईएमआयवर पर्यायावरही हा फोन खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळत आहे. डायमेंसिटी ७०२५ प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह १४ हजार ४९९ रुपये आहे. सेलमध्ये देण्यात आलेल्या बँक ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत एक हजार रुपयांपर्यंत कमी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. सॅमसंगचा हा फोन तुम्ही आकर्षक ईएमआयवर ही खरेदी करू शकता. फोनवर ११ हजार २०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला फुल एचडी+ रिझोल्यूशनसह ६.५ इंचाचा सॅमोलेड डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये बॅटरी ६००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली. हा फोन मीडियाटेक हेलियो ६१००+ प्रोसेसरवर काम करतो.
संबंधित बातम्या