Flipkart Upcomig Sale: इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा केली. येत्या ३ मे २०२४ पासून हा सेल सुरू होणार आहे. सेलदरम्यान टीव्ही, वियरेबल्स, होम अप्लायन्सेस अशा विविध श्रेणीतील इलेक्ट्रॉनिक्स अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. बजेट पर्यायांपासून प्रीमियम ऑफरपर्यंत अनेक स्मार्टफोन्सवर ही ऑफर लागू केली जाणार आहे.
या सेलची उत्सुकता वाढवण्यासाठी फ्लिपकार्टने आयफोन १४ आणि आयफोन १२ च्या किंमती कमी केल्या आहेत. यामुळे नवीन स्मार्टफोन, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी असेल. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलबाबत सविस्तर जाणून घेऊ.
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज अर्ली-बर्ड सेलमध्ये आयफोन १४ मॉडेलवर १२८ जीबी सह सवलतीच्या किंमती आणि ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. आयफोन १४ ची किंमत ६९ हजार ९९० रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलदरम्यान हा स्मार्टफोन अवघ्या ५५ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे आयफोन १४ वर खरेदीदारांना १९ टक्के सूट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, खरेदीदार बँक ऑफर्स उपलब्ध करून दिली शकते. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होईल. सिटी ब्रँडेड क्रेडिट कार्डच्या ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ग्राहकांना १५०० रुपयांपर्यंतच्या ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर १० टक्के सूट मिळेल. याशिवाय, आयफोन १४ च्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्जेंच ऑफर देखील दिली जात आहे. एक्स्चेंज ऑफरअंतर्गत ग्राहकांना ४१ हजारापर्यंत सूट मिळू शकते.
फ्लिपकार्ट सेलदरम्यान आयफोन 12 अवघ्या ४० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल, जे आयफोन १२ च्या मूळ किंमतीपेक्षा १७ टक्के कमी आहे. शिवाय, खरेदीदार बँक सवलत देखील दिली जाऊ शकते. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन १२ च्या खरेदीदारांना सिटी ब्रँडेड क्रेडिट कार्ड १५०० रुपयांपर्यंतच्या ईएमआय व्यवहारांवर ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर १० टक्के सूट मिळू शकते. एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनचा वापर करून ग्राहकांना २००० रुपयांची सूट देखील मिळणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला २ मे पासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. या ऑफर्ससोबतच इतर स्मार्टफोन्सवर आणखी डील्स आणि ऑफर्स समोर येणार आहेत.