Redmi: २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनवर तगडं डिस्काउंट, अवघ्या १९ मिनिटांत होतो चार्ज
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Redmi: २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनवर तगडं डिस्काउंट, अवघ्या १९ मिनिटांत होतो चार्ज

Redmi: २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनवर तगडं डिस्काउंट, अवघ्या १९ मिनिटांत होतो चार्ज

Feb 05, 2024 09:47 AM IST

Redmi Note 13 Pro Plus फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये रेडमी नोट १३ प्रो प्लस या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे.

Redmi
Redmi

Flipkart Big Saving Days: फोटोग्राफीचे वेड असलेल्या ग्राहकांना रेडमी कंपनीचा धमाकेदार फोनवर अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या रेडमी नोट १३ प्रो प्लस मोठ्या डिस्काऊंटसह मिळत आहे. या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट सुरु असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेल अंतर्गत हा स्मार्टफोन दोन हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी ग्राहकांना आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल.

आयसीआयसीआय बँकेतील खातेदारांना रेडमी नोट १३ प्रो प्लस स्मार्टफोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. याशिवाय, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना १९ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळत आहे.काही निवडक मॉडल्सच्या एक्स्चेंजवर दोन हजारांचे अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

या फोनमध्ये ग्राहकांना २७१२ x १२२० पिक्सल रेजॉल्यूशनसह ६.६७ इंच का कर्ल्ड AMOLED डिस्प्ले मिळत आहे, जो १२० Hz के रिफ्रेश रेट को सपोर्ट करते. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देत आहे. रेडमीच्या या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यामध्ये २०० मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा समावेश आहे. फोनमध्ये दिलेला फ्रंट कॅमेरा ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहाकांना या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १२० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अवघ्या १९ मिनिटांत फूल चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.

Whats_app_banner