Flipkart Sale : फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल होणार सुरू; विशेष ऑफरसह स्वस्तात घेता येणार विविध वस्तू-flipkart big billion days sale here is how to get early access for free with plus membership ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale : फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल होणार सुरू; विशेष ऑफरसह स्वस्तात घेता येणार विविध वस्तू

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल होणार सुरू; विशेष ऑफरसह स्वस्तात घेता येणार विविध वस्तू

Sep 17, 2024 08:59 AM IST

Flipkart Big Billion Days Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज २०२४ सेल महिन्याच्या शेवटी २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सेलमधून ग्राहकांना विविध वस्तु कमी किमतीत घेता येणार आहेत.

फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल होणार सुरू; विशेष ऑफरसह स्वस्तात घेता येणार विविध वस्तु
फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल होणार सुरू; विशेष ऑफरसह स्वस्तात घेता येणार विविध वस्तु

Flipkart Big Billion Days Sale : सध्या विविध सणांचे महीने सुरू आहे. पुढील महिन्यात नवरात्र, दसरा, आणि दिवाळी असल्याने फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरदेखील हे सण साजरे केले जाणार आहे. यासाठी बिग बिलियन डेज सेल २०२४ ची घोषणा फ्लिपकार्टने केली असून हा बंपर सेल २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये विविध श्रेणीतील विविध वस्तु बंपर डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे विक्रीचा फायदा तुम्ही इतरांपूर्वीच लवकर घेऊ शकता. या सेलचा लाभ कसा मिळवाल जाणून घेऊयात. 

असेल, तर तुम्ही इतरांपूर्वी विक्रीमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर आणि सवलतींचा लाभ घेऊ शकणार आहात. विशेष बाब म्हणजे फ्लिपकार्ट प्लस सदस्य होण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळी सबस्क्रिप्शन फी भरण्याची गरज नाही.

सोप्या पद्धतीने तुम्ही बनू शकता प्लस मेंबर

फ्लिपकार्टवर खरेदी करण्याच्या बदल्यात ग्राहकांना सुपर कॉइन्स मिळतात, ज्याचा वापर पैशांसारखा देखील केला जाऊ शकतो. जर तुम्ही गेल्या एका वर्षात फ्लिपकार्टवर खरेदी करून २०० पेक्षा जास्त सुपर कॉइन्स जमा केले असतील, तर तुम्ही प्लसचे सदस्य होय शकता. तसेच, तुम्ही गेल्या ३६५ दिवसांत चार वेळा खरेदी केली असेल, तर तुम्ही प्लस ए सदस्यासाठी पात्र व्हाल.

प्लस सदस्यत्वासाठी असा करा दावा

- तुम्हाला फ्लिपकार्ट शॉपिंग ॲप अपडेट करून ते उघडावे लागेल.

- यानंतर तळाशी असलेल्या खाते चिन्हावर टॅप करा.

- तुमचे नाव डावीकडे दिसेल आणि त्याखाली प्लस सदस्यत्व ऑप्शन दिसेल. त्या वर टॅप करा

- तुम्ही प्लस सदस्य नसल्यास, पण त्यासाठी पात्र असाल, तर स्क्रीनवर 'जाईन प्लस मेंबरशिप फॉर फ्री' असा पर्याय दिसेल.

- तुम्ही त्यावर टॅप करताच, तुम्ही प्लस सदस्य व्हाल आणि खाते विभागात नावाच्या खाली प्लस सदस्य दिसेल.

तुम्हाला एसएमएसद्वारे फ्लिपकार्ट प्लस सदस्यत्व अॅक्टिव झाल्याची माहिती मिळेल. खरेदीसाठी लवकर प्रवेश करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला प्रत्येक खरेदीवर खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांसाठी २ सुपर कॉइन मिळतील. तर, नॉन-प्लस सदस्यांना प्रत्येक १०० रुपयांच्या खरेदीवर एक सुपर कॉईन मिळेल. तुम्ही खूप खरेदी केल्यास तुम्हाला फ्लिपकार्ट प्रीमियम सदस्य बनवले जाईल. तर, तुम्ही ४९९ रुपये आणखी भरल्यास तुम्हाला अनेक फायद्यांसह फ्लिपकार्टचे व्हीआयपी सदस्यत्व देखील मिळू शकते.

सेलमध्ये विशेष बँक ऑफर्सचा लाभही मिळणार

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये विशेष सूट देण्यासाठी HDFC बँकेसोबत भागीदारी केली आहे. जर ग्राहकांनी HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरले तर त्यांना १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय सुलभ ईएमआय पर्यायही उपलब्ध असतील. ग्राहकांना निवडक कॅशबॅक पर्याय देखील दिले जातील.

Whats_app_banner