5G Smartphones: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आता अवघ्या काही तासात संपणार आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, पण बजेट कमी आहे? अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या १० दमदार 5G स्मार्टफोनची यादी तयार केली आहे. या यादीत सॅमसंग, रिअरमी, मोटोरोला सारख्या ब्रँडचाही समावेश आहे.
फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, सेलमध्ये उपलब्ध ऑफर्सचा फायदा घेत या फोनचे 6+128 जीबी मॉडेल 12,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.67 इंचाचा 120 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी 7050 प्रोसेसर आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
सेलमध्ये उपलब्ध ऑफर्सचा फायदा घेतया फोनचे 6+128 जीबी मॉडेल 10,499 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.67 इंचाचा 120 हर्ट्झ डिस्प्ले, 32 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी 6300 प्रोसेसर आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5100 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
सेलमध्ये या फोनचे ८+१२८ जीबी मॉडेल ११,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.72 इंचाचा 120 हर्ट्झ डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी 6100+ प्रोसेसर आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
विवो टी३एक्स ५जी ४+१२८ जीबी मॉडेल ११,२४९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.72 इंचाचा 120 हर्ट्झ डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर आणि 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 एमएएच बॅटरी आहे.
या फोनचे 6+128 जीबी मॉडेल 13,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.67 इंचाचा 120 हर्ट्झ सुपर एमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी 7300 प्रोसेसर आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी आहे.
या फोनचे १२+२५६ जीबी मॉडेल १३,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.5 इंचाचा 120 हर्ट्झ डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी 7025 प्रोसेसर आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
या फोनचे 8+256 जीबी मॉडेल 13,499 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.78 इंचाचा 120 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले, 108 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डायमेंसिटी 7020 प्रोसेसर आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
या फोनचे ४+१२८ जीबी मॉडेल ९,७४९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा मेन रिअर कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, एक्सीनॉस १३३० प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरी आहे.
हा फोन 7,499 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये 6.74 इंचाचा 90 हर्ट्झ डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरी आहे.