Motorola: फ्लिपकार्टवर मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह उपलब्ध, ग्राहकांचे 'इतके' पैसे वाचणार!-flipkart big billion days massive discount on motorola edge 50 pro ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola: फ्लिपकार्टवर मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह उपलब्ध, ग्राहकांचे 'इतके' पैसे वाचणार!

Motorola: फ्लिपकार्टवर मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह उपलब्ध, ग्राहकांचे 'इतके' पैसे वाचणार!

Oct 01, 2024 05:18 PM IST

Motorola Edge 50 Pro: फ्लिपकार्टवर ५० एमपी फ्रंट कॅमेरा असेलाल मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट ऑफर्स: मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे
फ्लिपकार्ट ऑफर्स: मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे

Flipkart Big Billion Days: फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डे सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी स्वस्तात उपलब्ध आहेत. दरम्यान, उत्तम सेल्फी कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या सेलअंतर्गत ग्राहक ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकतात. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. बिग बिलियन डे सेलमध्ये हा फोन १ हजार २५०रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. आयपी ६८ अंडरवॉटर प्रोटेक्शनसह या फोनवर १८ हजार ५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

मोटोरोला एज ५० प्रो: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये १.५ के रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा पीओएलईडी कर्व्ड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची पीक ब्राइटनेस लेव्हल २००० निट्सपर्यंत आहे.

मोटोरोला एज ५० प्रो: स्टोरेज

हा मोटोरोला फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

मोटोरोला एज ५० प्रो: कॅमेरा

यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्ससह १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स चा समावेश आहे. फोनचा मेन कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेरा ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसोबत येतो. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे.

मोटोरोला एज ५० प्रो: बॅटरी

मोटोरोला या फोनमध्ये ४ हजार ५०० एमएएच ची बॅटरी देत आहे. ही बॅटरी १२५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये ५० वॅट वायरलेस चार्जिंग देखील आहे. दमदार साउंड एक्सपीरियंससाठी तुम्हाला या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस देखील मिळेल.

Whats_app_banner
विभाग