Flipkart Sale: फ्लिपकार्टवर मोटोरोलाचे 'हे' तगडे फोन स्वस्तात उपलब्ध, ५ डिसेंबरपर्यंत ऑफर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart Sale: फ्लिपकार्टवर मोटोरोलाचे 'हे' तगडे फोन स्वस्तात उपलब्ध, ५ डिसेंबरपर्यंत ऑफर!

Flipkart Sale: फ्लिपकार्टवर मोटोरोलाचे 'हे' तगडे फोन स्वस्तात उपलब्ध, ५ डिसेंबरपर्यंत ऑफर!

Dec 01, 2024 01:08 PM IST

Motorola Smartphones: फ्लिपकार्टवर आजपासून बिग सेव्हिंग डेज सुरू झाले. या सेलमध्ये मोटोरोला कंपनीचे धमाकेदार स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध झाले आहेत.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

Flipkart Big Billion Days 2024: फ्लिपकार्टच्या मागील सेलमध्ये जर तुम्ही बेस्ट डीलमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्यास चुकला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आजपासून बिग सेव्हिंग डेज सुरू झाले आहेत. येत्या ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही टॉप कंपन्यांचे बेस्ट स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.दुसरीकडे जर तुम्ही मोटोरोलाचे फॅन असाल तर तुम्ही हा सेल अजिबात मिस करू शकत नाही.

या डीलमध्ये मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर २ हजार ५०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. येथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या फोनवरील तीन शानदार डील्सबद्दल सांगत आहोत. विशेष म्हणजे डीलमध्ये तुम्ही हे फोन बंपर एक्स्चेंज ऑफरसोबतही खरेदी करू शकता. पण एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

मोटोरोला जी ८५ 5G

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मोटोरोला जी ८५ 5G व्हेरियंटची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. याला १५०० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ५ टक्के सूट मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला१६ हजार ५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फोनमध्ये तुम्हाला ६.६७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला एज ५० प्रो 5G

मोटोरोला एज ५० प्रो 5G च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत २ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्संना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. फोनवर ३० हजार ३०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील आहे. कंपनी फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आणि सेल्फी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये तुम्हाला ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. ही बॅटरी १२५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोरोला एज ५० फ्यूजन

हा फोन फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही २ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये कंपनी २३ हजार २०० रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये ६.७ इंचाचा पीओएलईडी कर्व्ड डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी यात तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

Whats_app_banner