३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला फोन झाला स्वस्त, फ्लिपकार्टची जबरदस्त डील-flipkart big billion day sale 2024 massive discount on motorola g85 5g ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला फोन झाला स्वस्त, फ्लिपकार्टची जबरदस्त डील

३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला फोन झाला स्वस्त, फ्लिपकार्टची जबरदस्त डील

Sep 28, 2024 06:50 PM IST

Flipkart Big Billion Day Sale 2024: फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डे सेलमध्ये मोटोरोला जी ८५ 5G च्या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे.

मोटोरोला जी ८५ 5G स्वस्तात मिळवण्याची संधी
मोटोरोला जी ८५ 5G स्वस्तात मिळवण्याची संधी

Motorola G85 5G: बजेटमध्ये उत्तम सेल्फी कॅमेरा असलेला फोन शोधत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सध्या बिग बिलियन डे सेल सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहक मोटोरोलाचा ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेल्या मोटोरोला जी ८५ 5G या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. सेलमध्ये या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत १ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. 

हा स्मार्टफोन अवघ्या १५ हजार ४९९ रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करताना अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला १० हजार ४५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

मोटोरोला जी ८५ 5G: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.६७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात येणारा हा थ्रीडी कर्व्ड पीओएलईडी डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ५ कोटिंग देखील देत आहे.

मोटोरोला जी ८५ 5G: डिस्प्ले

हा फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 3 चिपसेट पाहायला मिळेल.

मोटोरोला जी ८५ 5G: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला जी ८५ 5G: बॅटरी

 मोटोरोलाच्या या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएच ची आहे. ही बॅटरी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, फोन अँड्रॉइड १४ वर आधारित हॅलो यूआयवर काम करतो. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

Whats_app_banner
विभाग