Flipkart News: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला आयफोनची ऑर्डर रद्द करणे महागात पडले. ऑर्डर रद्द केल्यामुळे संबंधित ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासासाठी मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फ्लिपकार्टविरोधात कारवाई केली. तसेच फ्लिपकार्टला संबधित ग्राहकाला १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, फ्लिपकार्टने अतिरिक्त नफा कमावण्यासाठी संबंधित ग्राहकाची ऑर्डर रद्द केली, जे अतिशय चुकीचे आहे. ग्राहकाला परतावा मिळाला. पण एकतर्फी ऑर्डर रद्द केल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई मिळणे गरजेचे असल्याचे आयोगाने नमूद केले.
मुंबईतील दादर येथील रहिवासी असलेल्या या ग्राहकाने १० जुलै २०२२ रोजी फ्लिपकार्टवरून आयफोनची ऑर्डर दिली आणि क्रेडिट कार्डचा वापर करून ३९,६२८ रुपये भरले. तक्रारीनुसार, १२ जुलै २०२२ रोजी आयफोनची डिलिव्हरी होणार होती. पण सहा दिवसांनी ग्राहकाला कंपनीकडून ऑर्डर रद्द झाल्याचा मॅसेज आला. फ्लिपकार्टशी संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकाला सांगितले की, त्यांच्या डिलिव्हरी बॉयने आयफोनची डिलिव्हरी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, तो उपलब्ध नव्हता आणि म्हणूनच ही ऑर्डर रद्द करण्यात आली.
ही ऑर्डर रद्द केल्याने ग्राहकांना मानसिक त्रासही झाला आणि ऑनलाइन फसवणुकीला सामोर असा आरोप तक्रारदाराने केला. फ्लिपकार्टची प्रतिक्रिया फ्लिपकार्टने आपल्या लेखी उत्तरात असा युक्तिवाद केला की, डिलिव्हरी पर्सनने पत्त्यावर प्रॉडक्ट पोहोचवण्याचा अनेक प्रयत्न केला होता, पण तक्रारदार उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे विक्रेत्याने ऑर्डर रद्द केली. संबंधित ग्राहकांचे पेसे परत करण्यात आले असून हा वाद केवळ तक्रारदार आणि विक्रेत्यामध्ये असून फ्लिपकार्टवर कारवाईचे कोणतेही कारण नाही.
संबंधित बातम्या