iPhone Sale: आयफोन १५ खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अग्रगण्य ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरून आयफोन १५ अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सुरू असलेल्य सेल अंतर्गत आयफोन १५ स्वस्तात विकले जात आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या डीलसह फोन विकत आहेत. परंतु, मोठ्या सवलतींसह आयफोन १५ कुठे विकला जात आहे, हे जाणून घेऊयात.
फ्लिपकार्टवर फ्लॅगशिप सेल सुरू आहे. तर, ॲमेझॉनवर फ्रीडम सेल सुरू आहे. या अंतर्गत आयफोनच्या विविध मॉडेल्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट आयफोन १५ च्या खरेदीवर १२ टक्के सूट देत आहे. ॲमेझॉनवर आयफोन १५ हा १० टक्के डिस्काउंटसह विकला जात आहे.
फ्लिपकार्ट फ्लॅगशिप सेल दरम्यान आयफोन १५ हा मूळ किंमतीपेक्षा १२ टक्क्यांनी स्वस्त विकला जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आयफोन १५ चा १२८ जीबी व्हेरिएंट ७९ हजार ६०० पयांऐवजी ६९ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. याशिवाय,ग्राहकांना आयफोन १५ च्या खरेदीवर बँक ऑफर देखील मिळत आहे. ॲक्सिस बँक कार्ड असलेल्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक दिले जात आहे. तसेच यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १००० रुपयांची सूट मिळत आहे. याचबरोबर ग्राहकांसाठी एक्स्जेंच ऑफर देखील उपलब्ध करून दिली आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत ग्राहक ५३ हजार १५० रुपयांपर्यंत बचत करू शकतात. परंतु, एक्स्चेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनची कंडीशन आणि मॉडेल याच्यावर अवलंबून असेल.
ॲमेझॉन फ्रीडम सेलमध्ये आयफोन १५ च्या खरेदीवर ग्राहकांना १० टक्के सूट मिळत आहे. या सेलंतर्गत आयफोन १५ (१२८ जीबी) ७९ हजार ६०० रुपयांऐवजी ७१ हजार २९० रुपयांना खरेदी करू शकता. निवडक कार्ड्सवर ४००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या फोनवर ग्राहकांना ५५ हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट दिले जात आहे. या ऑफरचा लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही चांगल्या स्थितीत असलेला आणि नवीनतम मॉडेल सूचीमध्ये असलेला फोन एक्स्चेंज कराल. या ऑफर्ससंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.