मराठी बातम्या  /  Business  /  Fixed Deposit. This Will Give Less Interest And Will Have To Pay Penalty Here Understand Its Complete Math

Fixed Deposit : एफडी मोडताय? थांबा! संकटकाळात ‘असा’ मिळू शकतो आधार

Fixed deposit HT
Fixed deposit HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Nov 25, 2022 02:24 PM IST

Fixed Deposit : कोणत्याही मोठ्या संकटकाळात अचानक पैशाची निकड भासल्यास आपण सर्वात पहिल्यांदा मुदत ठेव (फिक्स्ड डिपाॅडिट्स) मोडतो. पण असे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते.

Fixed Deposit : कोणत्याही मोठ्या संकटकाळात अचानक पैशाची निकड भासल्यास आपण सर्वात पहिल्यांदा मुदत ठेव (फिक्स्ड डिपाॅडिट्स) मोडतो. पण असे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. कारण परिपक्वतेच्या आधी एफडी मोडल्यास तुम्हाला कमी व्याज मिळेल. त्याशिवाय तुम्हाला पेनल्टीपण द्यावी लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

वेळेपूर्वी एफडी मोडल्यास असे होईल नुकसान

ज्या दरांसाठी तुम्ही बॅकेत एफडी करतात, त्याचा उद्देश वेळेपूर्वी मोडल्याने साध्य होत नाही. एसबीआय़च्या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, अशावेळी ज्या दराने तुम्ही एफडी केली असेल त्या दरात घट होते. उदाहऱणार्थ, १ लाख एफडीवर १ वर्षाच्या मुदतीवर ६ टक्के व्याज दराने एफडीत पैसे गुंतवले आहेत. पण पुडील सहा महिन्यातच तुम्ही त्यातील पैसे काढून घेतले तर त्या रकमेवर फक्त ५ टक्के व्याज मिळते.

पेनल्टीची रक्कम

जर एखाद्या व्यक्तीने ५ लाखांपर्यंत एफडी केले असेल तर त्याला मुदतपूर्वी एफडी तोडल्याने ०.५० टक्के पेनल्टी द्यावी लागेल. याचप्रमाणे ५ लाखांपेक्षा अधिक आणि १ कोटींपेक्षा कमी रकमेवर १ टक्का पेनल्टी द्यावी लागेल. एफडी वेळेपूर्वी काढून घेतल्याने हा भूर्दंड द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ १ टक्का व्याजकपात करुन झाल्यानंतर मिळणाऱ्या रकमेवर पेनल्टी लावली जाते आणि त्यानंतर उरलेली रक्कम ग्राहकांच्या हातात पडते.

एफडीवर कर्ज सवलत

या अंतर्गत एफडीच्या एकूण रकमेंतर्गत ९० टक्के कर्ज घेता येते. जर एफडीची किंमत १.५ लाख रुपये आहे, तर तुम्हाला १ लाख ३५ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. जर तुम्ही एफडीवर कर्ज घेतले तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा १ ते २ टक्के अतिरिक्त व्याज दयावे लागणार आहे.

एफडी मोड अथवा एफडीवर कर्ज... कोणता पर्याय योग्य

जर तुमच्या एफडीमध्ये १ लाखांपर्यंतची रक्कम आहे आणि तुम्हाला ५० हजारांपर्यंत कर्ज हवे असेल तर अशावेळी कर्ज घेणे अधिक फायद्याचे ठरु शकेल. कारण तुमची आर्थिक गरज पूर्ण होईलच पण त्याचबरोबर बचतही सुरक्षित राहील.

विभाग