मराठी बातम्या  /  बिझनेस  /  FD interest to Senior Citizen : वृद्धापकाळात अतिरिक्त व्याजदराचा आधार, ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँका देतायेत बक्कळ व्याज

FD interest to Senior Citizen : वृद्धापकाळात अतिरिक्त व्याजदराचा आधार, ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँका देतायेत बक्कळ व्याज

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jun 01, 2023 07:18 PM IST

FD interest to Senior Citizen : स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडी गुंतवणुकीवर ९% पर्यंत व्याज दर देत आहेत. या बँकांमध्ये ५ लाखांपर्यंतची गुंतवणूकीची रक्कम सुरक्षित आहे.

FD rates for seniors HT
FD rates for seniors HT

FD interest to Senior Citizen : अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केल्यानंतरही अनेक मोठ्या सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका अजूनही त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ९% व्याजदर देऊ शकत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला अशा ६ बँकांबद्दल सांगत आहोत ज्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत.

यूनिटी स्माॅल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर चांगले व्याज देत आहे. बँक सामान्य नागरिकांना मुदत ठेवींवर ९ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ९.५० टक्के व्याज देत आहे. मुदतीच्या ठेवीच्या १००१ दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ९.५० टक्के व्याजदर दिला जात आहे. एवढेच नाही तर, ज्येष्ठ नागरिकांना १८१ ते २०१ दिवस आणि ५०१ दिवसांच्या कालावधीसाठी ९.२५ टक्के व्याज दिले जात आहे.

फिनकेअर स्माॅल फायनान्स बँक

फिनकेअर स्माॅल फायनान्स बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदर ९.११ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. ही बँक सर्वसामान्य नागरिकांना ३ टक्के ते ८.५१ टक्के व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना १००० दिवसांच्या अवधीसाठी ३.६० टक्के ते ९.११ टक्के व्याजदर देत आहे.

सूर्योदय स्माॅल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदर ९.६० टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर ४.५०% ते ९.६०% पर्यंत व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, ९९९ दिवसांच्या कालावधीसाठी ९.५०% व्याज दराने आणि १ वर्ष ते २ वर्षांच्या कालावधीसाठी ९% व्याजदराने व्याज दिले जात आहे. बँकेने हे नवीन दर ५ मे २०२३ पासून लागू केले आहेत.

इक्विटास स्माॅल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ८८८ दिवसांच्या मुदत ठेवीसाठी ९% व्याज दर देत आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ८८८ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर ८.५ टक्के व्याजदराने व्याज दिले जात आहे. बँकेने हे नवीन व्याजदर ११ एप्रिल २०२३ पासून लागू केले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग