मराठी बातम्या  /  बिझनेस  /  NESFB FD rates : एफडीवर तब्बल ९.७५ टक्के व्याज; 'या' बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट

NESFB FD rates : एफडीवर तब्बल ९.७५ टक्के व्याज; 'या' बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट

Jun 20, 2024 04:21 PM IST

North East Small Finance Bank FD Rates : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेनं ग्राहकांना खास भेट दिली आहे. ही बँक एफडीवर सध्या ९.७५ टक्के व्याज देत आहे. जाणून घ्या सर्व माहिती!

एफडीवर तब्बल ९.७५ टक्के व्याज; 'या' बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट
एफडीवर तब्बल ९.७५ टक्के व्याज; 'या' बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट

North East Small Finance Bank FD Rates : गुंतवणुकीसाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध असले तरी बँकेच्या एफडीवर सर्वसामान्यांचा विश्वास अजूनही कायम आहे. ‘पैसे बुडणार नाहीत’ ही हमी हा एफडीचा मोठा यूएसपी आहे. अलीकडच्या काळात एफडीच्या व्याजदरात वाढ झाल्यानं गुंतवणूकदार पुन्हा त्याकडं आकर्षित झालेत. काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देत आहेत.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक (NESFB) या सगळ्यात आघाडी घेतली आहे. या बँकेनं त्यांच्या FD व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सनं वाढ केली आहे. सध्या ही बँक ५४६ ते ११११ दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर १ कोटी ते ५ कोटी रुपयांच्या नॉन-कॉलेबल ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ९.७५ टक्के व्याज देत आहे. रिडीम करण्यायोग्य ठेवींसाठी बँक त्याच कालावधीत ९.५० टक्के व्याज देत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ग्राहकांसाठी सोय

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचे ग्राहक त्यांच्या घरी बसून एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यासाठी ते मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकतात. ठेवीदाराच्या अधिकृत बचत खात्यात FD खात्यातून मासिक किंवा त्रैमासिक आधारावर व्याज मिळते. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक डोअरस्टेप बँकिंग, ऑटो रिन्यू, आंशिक पैसे काढणे, पुनर्गुंतवणूक पर्याय आणि कर्ज/ओडी सुविधा यासारख्या सेवा देते. बँक एफडी मॅच्युरिटीच्या आधी काढल्यास बँकेकडून १ टक्के दंड आकारला जातो.

रेपो दरात कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नं अलीकडंच पतधोरणाचा आढावा घेतला. त्यावेळी बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नाही. आरबीआयनं हा दर ६.५ टक्के कायम ठेवला आहे. अर्थव्यवस्था जोमान वाढत असताना महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नात, RBI नं सलग आठव्यांदा रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे. रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळं बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात कपात होण्याची शक्यताही मावळली आहे.

WhatsApp channel