Amazon Deal : लोकप्रिय विअरेबल ब्रँड फायरबोल्टकडून भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून प्रिमियम फिचर्स आणि अॅप्पल वाॅचप्रमाणे नव्या डिझाईनचे फायर बाॅल्ट अॅस्ट्राॅईड स्मार्टवाॅच लाँन्च करण्यात आले. या स्मार्टवाॅचला ८० टक्क्यांपेक्षा अधिक फ्लॅट सवलतींसह खरेदी कऱण्याची संधी अॅमेझाॅनने दिली आहे. या स्मार्टवाॅचला ३००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
नव्या स्मार्टवाॅचमध्ये गोलमटोल मेटल डायल दिले आहे. त्यासह इनोव्हेटिव्ह ओसन ब्रँड स्ट्रॅप दिले आहे. अमोलेड डिस्प्ले स्क्रिन असल्यामुळे या घड्याळ्यात आॅलवेज आॅन डिस्प्लेचा सपोर्ट मिळतो. या स्मार्टवाॅचमध्ये फिजिकल रोटेटिंग क्राऊन दिला आहे आणि तो वाॅईस असिस्टंटद्वारेही कंट्रोल करता येतो. फिटनेस फिचर्समध्ये त्यात १२३ स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. ब्ल्यूटूथ काॅलिंगचा फायदाही यासह मिळतो.
अॅमेझाॅनवर या स्मार्टवाॅचची एमआरपी १५९९९ रुपये दाखवण्यात आले आहे. मात्र डील आॅफ दे डे मध्ये त्यात ८१ टक्के सवलत देण्यात आली आहे. मोठ्या सवलतीनंतर या स्मार्टवाॅचची किंमत केवळ २९९९ रुपये आहे. एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्डवरून ५ टक्के इंस्टंट सवलत दिली जाते. एक्सेंच आॅफरवर २८०० रुपयांची सूट मिळते.
नव्या स्मार्टवाॅचमध्ये १.२४ इंच गोल अमोलेड डिस्प्ले देण्यात आले आहे. जे ४६६*४६६ पिक्सल रिझाॅल्यूशन आणि ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट्स देण्यात आले आहे. आॅलवेज आॅन डिस्प्लेसह या वाॅचमध्ये लो पावर कंजप्शनचा फायदा यूजरला मिळतो. वाॅचमध्ये ब्लूटूथ काॅलिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. काॅटॅक्ट सिंक करण्याशिवाय क्विक अॅक्सेस डायल पॅड आणि काॅल हिस्ट्रीदेखील देण्यात आली आहे. यात गुगल असिस्टंट आणि सिरीचाही सपोर्ट देण्यात आला आहे.फिटनेस आणि हेल्थ फिचर्समध्ये तब्बल १२३ स्पोर्ट्स मोड्स मिळतात.