multibagger stock : अवघ्या ३३ रुपयांचा शेअर ४०० वर गेला; नफ्याचं तर विचारूच नका!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  multibagger stock : अवघ्या ३३ रुपयांचा शेअर ४०० वर गेला; नफ्याचं तर विचारूच नका!

multibagger stock : अवघ्या ३३ रुपयांचा शेअर ४०० वर गेला; नफ्याचं तर विचारूच नका!

Feb 13, 2024 05:00 PM IST

Multibagger Stock News : फिनोटेक्स केमिकलच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून संयम बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना गोड फळ मिळालं आहे.

Fineotex Chemical Price
Fineotex Chemical Price

Fineotex Chemical Share Price : वाट पाहणं ही जगातील सर्वात कंटाळवाणी आणि अवघड गोष्ट समजली जाते. शेअर बाजारात हीच कंटाळवाणी समजली जाणारी गोष्ट तुमची सगळी आर्थिक गणितं बदलू शकते. फिनोटेक्स केमिकल या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना असाच अनुभव दिला आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल करून टाकलं आहे.

फिनोटेक्स केमिकलनं मागच्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना १००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागच्या ५ वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत ३३.७५ रुपयांवरून थेट ४०० रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत ५२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या अवघ्या महिन्यात शेअरनं १२ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

आता कंपनीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मागच्या सलग ४ सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी ४०२ रुपयांपर्यंत मजला मारून आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर विक्रीचा जोर दिसू लागला. आज कंपनीच्या शेअरमध्ये दिवसभरात अर्धा टक्क्याची घसरण झाली.

शेअर बाजारात कंपनीची घोडदौड सुरू असतानाच कंपनीनं आणखी निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या संदर्भात कंपनीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात शेअरच्या बदल्यात निधी उभारण्याचा निर्णय झाला. कंपनीनं सोमवारी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली आहे.

दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्याकडंही शेअर्स

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्याकडं डिसेंबर तिमाहीत फिनोटेक्स केमिकल लिमिटेडमध्ये ३१,३५,५६८ शेअर आहेत. म्हणजेच कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी केवळ २.८३ टक्के आहे. सप्टेंबर तिमाही ते डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीच्या शेअर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Whats_app_banner