High Bank FD Rates : गुंतवणुकीच्या बाबतीत कुठलीही जोखीम नको असलेल्या गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी हा विश्वासार्ह पर्याय आहे. आज गुंतवणुकीचे विविध पर्याय असले तरी एफडीवरील विश्वास कायम आहे. एफडी ही शेअर मार्केट इतका परतावा देऊ शकत नसली तरी त्यावर जास्तीत जास्त परतावा नक्कीच मिळू शकतो. त्यासाठी एफडीवर जास्त व्याज देणाऱ्या बँकांची माहिती काढणं गरजेचं आहे.
सध्या भारतात अशा अनेक बँका आहेत, ज्या एफडीवर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देतात. यात स्मॉल फायनान्स बँका आघाडीवर आहेत. या बँका सरकारी, खासगी आणि परदेशी बँकांच्या तुलनेत जास्त व्याज दर देतात. जाणून घेऊया स्मॉल फायनान्स, सरकारी, खासगी आणि परदेशी बँकांच्या एफडीचे ताजे दर…
> नॉर्थईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ५४६ दिवस ते ११११ दिवसांच्या कालावधीसाठी ९.००% व्याज.
> युनिटी स्मॉल फायनान्स बँक : १००१ दिवसांच्या मुदतीसाठी ९.००% व्याजदर.
> सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : २ ते ३ वर्षांच्या एफडीवर ८.६० टक्के परतावा.
> जना स्मॉल फायनान्स बँक : १ ते ३ वर्षांसाठी ८.२५ टक्के व्याजदर.
> उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : २ वर्षे ते ३ वर्षांसाठी ८.५० टक्के परतावा.
> इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : ८८८ दिवसांसाठी ८.२५ टक्के व्याजदर.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका कमी व्याजदर देतात. मात्र सर्वसामान्यांचा या बँकांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळं तिथं एफडी करण्यास पसंती दिली जाते.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ११११ किंवा ३३३३ दिवसांच्या कालावधीसाठी ७.५० टक्के.
बँक ऑफ महाराष्ट्र : ३६६ दिवसांसाठी ७.४५ टक्के व्याज.
कॅनरा बँक : ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.४० टक्के व्याजदर.
इंडियन बँक : ४०० दिवसांच्या मुदतीसाठी ७.३० टक्के व्याजदर.
युनियन बँक ऑफ इंडिया : ४५६ दिवसांसाठी ७.३० टक्के व्याज दर
खासगी क्षेत्रातील बँका स्मॉल फायनान्स बँकांच्या तुलनेत एफडीवर तुलनेनं कमी व्याज दर देतात. मात्र, हे दर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा अधिक असतात.
बंधन बँक : १ वर्षाच्या मुदतीसाठी ८.०५ टक्के .
डीसीबी बँक: १९ महिने ते २० महिन्यांसाठी ८.०५ टक्के
आरबीएल बँक: ५०० दिवसांसाठी ८ टक्के
इंडसइंड बँक: १ वर्ष ५ महिने ते १ वर्ष ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.९९ टक्के
आयडीएफसी फर्स्ट बँक: ४०० ते ५०० दिवसांसाठी ७.९० टक्के
एचडीएफसी बँक: ४ वर्षे ७ महिन्यांसाठी (५५ महिने) ७.४० टक्के
आयसीआयसीआय बँक : १५ महिने ते २ वर्षांसाठी ७.२५ टक्के
डॉइच बँक : १ वर्ष ते ३ वर्षांवरील लोकांसाठी ८ टक्के
स्टँडर्ड चार्टर्ड बँक : १ वर्ष ते ३७५ दिवसांसाठी ७.५० टक्के
एचएसबीसी बँक : ६०१ ते ६९९ दिवसांच्या कालावधीसाठी ७.५० टक्के
संबंधित बातम्या