Axis Bank FD Rate Hike : गेल्या काही दिवसांपासून बँकांच्या व्याजदरात वाढ होत असून एका मागोमाग एक बँका व्याजदर वाढीच्या घोषणा करत आहेत. आता अॅक्सिस बँकेनं दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. मागच्या दीड महिन्यात अॅक्सिस बँकेनं दुसऱ्यांदा व्याजदर वाढवले आहेत.
अॅक्सिसचे नवे एफडी दर ५ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाईटनुसार, बँकेनं २६ डिसेंबर २०२३ रोजी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला होता. त्यानंतर आता पुन्हा बदल केले आहेत. त्यानुसार सर्वसाधारण ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर वार्षिक ३.५० ते ७.२० टक्के दरानं व्याज मिळणार आहे.
अॅक्सिस बँकेनं १७ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात १० बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. इतर श्रेणींमध्ये बँकेनं व्याजदर कायम ठेवले आहेत. ताज्या दरवाढीनंतर १७ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.२० टक्के व्याज मिळेल.
७ - १४ दिवस - ३ टक्के
१५ - २९ दिवस - ३ टक्के
३० - ४५ दिवस - ३.५० टक्के
४६ - ६० दिवस - ४.२५ टक्के
६१ दिवस < ३ महिने - ४.५० टक्के
३ महिने - ३ महिने २४ दिवस - ४.७५ टक्के
३ महिने २५ दिवस < ४ महिने - ४.७५ टक्के
४ महिने < ५ महिने - ४.७५ टक्के
५ महिने < ६ महिने - ४.७५ टक्के
६ महिने < ७ महिने - ५.७५ टक्के
७ महिने < ८ महिने - ५.७५ टक्के
८ महिने < ९ महिने - ५.७५ टक्के
९ महिने < १० महिने - ६ टक्के
१० महिने < ११ महिने ६ टक्के
११ महिने - ११ महिने २४ दिवस - ६ टक्के
११ महिने २५ दिवस < १ वर्ष - ६ टक्के
१ वर्ष - १ वर्ष ४ दिवस - ६.७० टक्के
१ वर्ष ५ दिवस - १ वर्ष १० दिवस - ६.७० टक्के
१ वर्ष ११ दिवस - १ वर्ष २४ दिवस - ६.७० टक्के
१ वर्ष २५ दिवस < १३ महिने - ६.७० टक्के
१३ महिने < १४ महिने - ६.७० टक्के
१४ महिने < १५ महिने - ६.७० टक्के
१५ महिने - १६ महिने - ७.१० टक्के
१६ महिने - १७ महिने - ७.१० टक्के
१७ महिने - १८ महिने - ७.२० टक्के
१८ महिने - २ वर्षे - ७.१० टक्के
२ वर्षे - ३० महिने - ७.१० टक्के
३० महिने - ३ वर्षे - ७.१० टक्के
३ वर्षे - ५ वर्षे - ७.१० टक्के
५ वर्षे - १० वर्षे - ७ टक्के
ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ३.५० ते ७.८५ टक्के दिले जाणार आहेत. हे दर ५ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) देखील या महिन्यात मुदत ठेवींवरील दरात बदल केले आहेत. नव्या दरानुसार, बँक ७ दिवस ते १० वर्षे कालावधीच्या एफडीसाठी सर्वसाधारण ग्राहकांना ३.५० ते ७.२५ टक्के व्याज देणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच दर ४ टक्के ते ७.७५ टक्के इतका असेल. हे दर १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू आहेत.
संबंधित बातम्या