मराठी बातम्या  /  बिझनेस  /  FD Calcuation : पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षे करा गुंतवणूक, या योजनेवर मिळेल दुप्पट परतावा

FD Calcuation : पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षे करा गुंतवणूक, या योजनेवर मिळेल दुप्पट परतावा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 14, 2023 10:29 AM IST

FD Calcuation : तुम्ही अशा गुंतवणूकदरांपैकी असाल ज्यांना धोका पत्करायचा नाही आणि निश्चित परवावा हवा आहे, तर पोस्ट आॅफिसमधील ही योजना तुमची मार्गदर्शक बनेत. जाणून घ्या त्याबद्दल

fixed deposit HT
fixed deposit HT

FD Calcuation : पोस्ट ऑफिसमधील पाच वर्षांची मुदत ठेव योजना (एफडी सारखी) गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. सध्या या योजनेसाठी ७ टक्के व्याजदर लागू आहे. यामध्ये व्याज दर वार्षिक असतो. परंतु त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. या योजनेत किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीसाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आणि निश्चित परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टीडी योजनेत एकरकमी पैसे गुंतवू शकता.

१ लाखांवर किती मिळेल परतावा

पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही आज १ लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर म्हणजेच ५ वर्षांनंतर तुम्हाला ७ टक्के व्याजदराच्या आधारावर १,४१,४७८८ रुपये मिळतील. यामध्ये १ लाख रुपये ही तुमची गुंतवणूक रक्कम आहे आणि त्यावर तुम्हाला ४१, ४७८ रुपयांचा वास्तविक परतावा मिळेल. या पोस्ट ऑफिस योजनेंतर्गत केलेली गुंतवणूकही सुरक्षित असते.

२ लाखांवर किती मिळेल परतावा

जर तुम्ही पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये तारखेनुसार २ लाख रुपये गुंतवले तर ७ टक्के व्याजदराच्या आधारावर, मॅच्युरिटीवर म्हणजेच ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण २,८२,९५६ रुपये मिळतील. तुमच्याकडे २ लाख रुपयांची गुंतवणूक आहे आणि तुम्हाला परतावा म्हणून ८२,९५६ रुपये मिळतील.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकता. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत देखील लाभ आहेत. मॅच्युरिटी झाल्यावर, तुम्ही त्याचा कालावधी वाढवू शकतात. यात एकटे अथवा संयुक्तपणेही खाते उघडता येते. अल्पवयीन देखील हे खाते ऑपरेट करू शकते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग