Raymond Dispute : प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडमध्ये भारतीयांच्या मनात रेमंडने आपले अधिराज्य गाजवले आहे. सलग १०० वर्षांहून अधिक जूना ब्रँड असलेल्या रेमंडचे साम्राज्य कैलासपत सिंधानिया यांनी उभे केले. आपल्या व्यावसायिकतेत विविध प्रयोग करुन ब्रँड अव्वल राखला.
रेमंडने १९०० साली ठाणे जिल्ह्यातून वूलन मिल म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्याचे नाव वाडिया मिल ठेवण्यात आले. लष्करासाठी गणवेश तयार करणे हे त्यांचे काम होते. ही मिल मुंबईतील एका व्यावसायिकांने १९२५ मध्ये खरेदी केली होती. कैलाशपत सिंधनिया यांनी ही मिल १९४० मध्ये याच व्यावसायिकाकडून विकत घेतली. त्यांनी वाडिया मिलचे नाव बदलून रेमंड मिल असे ठेवले. या मिलमध्ये त्यांनी लोकरीचे कपडे विकण्यास सुरुवात केली. १९६० मध्ये या मिलमध्ये विदेशी मशिनने कपडे पहिल्यांदा बनवले गेले.
हळूहळू कंपनी प्रसिद्ध होऊ लागली. याचे श्रेयही कंपनीच्या टॅग लाईनला जाते. ज्यात 'द कम्प्लीट मॅन' आणि 'फील्स लाइक हेवन' या टॅगलाईन प्रसिद्ध झाल्या. १९८० मध्ये रेमंडची कमान विजयपत सिंघानिया यांच्या हाती आली. ज्यांनी हा व्यवसाय भारताबाहेरही वाढवला. त्यांनी या कंपनीला नव्या उंचीवर नेले.
२०१५ मध्ये विजयपत सिंघानिया यांनी त्यांचे सुमारे १२००० कोटी रुपयांचे सर्व शेअर्स आणि कंपनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानियाला दिले. येथूनच वादाला सुरुवात झाली. एका फ्लॅटवरून पिता-पुत्रांमध्ये वाद सुरू झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. वडिलांना हा फ्लॅट विकायचा होता, पण गौतमने त्याला नकार दिला. हा वाद इतका वाढला की, एवढ्या मोठ्या उद्योगपती कुटुंबात पिता-पुत्रातील भांडण चव्हाट्यावर आले. एक वेळ अशीही आली जेव्हा गौतम सिंघानियाने वडील विजयपत सिंघानिया यांना बेघर केले. त्यानंतर त्यांना भाड्याच्या घरातही राहावे लागले.
संबंधित बातम्या