(1 / 5)५०० रुपयांच्या बनावट नोटा देशाच्या बाजारात २००० रुपयांपेक्षा जास्त आहेत. असे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. २०२२-२३ मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या १४.४ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये सुमारे ९१,११० ने वाढ झाली आहे. दुसरीकडे, २००० रुपयांच्या ९,८०६ बनावट नोटा सापडल्या, असे अहवालात म्हटले आहे.(PTI)