Income Tax : परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड, आयकर विभागाचा इशारा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Income Tax : परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड, आयकर विभागाचा इशारा

Income Tax : परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड, आयकर विभागाचा इशारा

Nov 17, 2024 06:12 PM IST

Income Tax News In Marathi : प्राप्तिकर विभागाने करदात्यांना परदेशात असलेल्या मालमत्तांचे विवरणपत्रात जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. अशा मालमत्ता जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

Income Tax : परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड, आयकर विभागाचा इशारा
Income Tax : परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड, आयकर विभागाचा इशारा

जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना परदेशात असलेली मालमत्ता किंवा परदेशात कमावलेले उत्पन्न विवरणपत्रात जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. तसे न केल्यास काळा पैसा विरोधी कायद्यांतर्गत १० लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

वास्तविक, आयकर विभागाने शनिवारी (१६ नोव्हेंबर) करदात्यांना वॉर्निंग दिली आहे, की त्यांनी परदेशात असलेली मालमत्ता किंवा परदेशात कमावलेले उत्पन्न त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये जाहीर केले नाही तर त्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

आयकर विभागाने काय म्हटले?

नुकत्याच सुरू झालेल्या अनुपालन-सह-जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून आयकर विभागाने शनिवारी ही माहिती दिली. विभागाने करदात्यांना चेतावणी दिली की त्यांनी २०२४-१५ च्या मूल्यांकन वर्षासाठी त्यांच्या प्राप्तिकर रिटर्नमध्ये ही माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.

विभागाने म्हटले आहे की, भारतीय करदात्यांनी कोणत्याही भांडवली मालमत्तेचा रिपोर्ट देणे आवश्यक आहे, यामध्ये परदेशी बँक खाती, रोख मूल्य विमा करार किंवा वार्षिक करार, कोणत्याही संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक भागीदारी, स्थावर मालमत्ता, इक्विटी आणि कर्ज व्याज इत्यांची समावेश आहे.

आयकर विभागाने पुढे म्हटले आहे की, करदात्यांना त्यांचे उत्पन्न 'करपात्र मर्यादेपेक्षा कमी' असले तरीही त्यांच्या ITR मध्ये विदेशी मालमत्ता (FA) किंवा विदेशी स्रोत उत्पन्न (FSI) शेड्यूल 'अनिवार्यपणे' भरावे लागेल.

"आयटीआरमध्ये परकीय मालमत्ता/उत्पन्न उघड न केल्यास काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, २०१५ अंतर्गत १० लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो,".

आयकर रिटर्न भरलेल्या लोकांना मेसेज पाठवले जातील

कर विभागाची प्रशासकीय संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) सांगितले आहे की, मोहिमेअंतर्गत २०२४-२५ साठी आयटीआर भरलेल्या करदात्यांना मेसेज आणि ईमेल पाठवले जातील. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करारांअंतर्गत मिळालेल्या माहितीद्वारे 'ओळख' झालेल्या व्यक्तींना हा संदेश पाठविला जातील, ज्यांची परदेशात मालमत्ता किंवा परकीय उत्पन्न असण्याची शक्यता आहे.

CBDT ने असेही सांगितले, की या मोहिमेचा उद्देश ज्यांनी त्यांच्या सबमिट केलेल्या ITR (AY 2024-25) मध्ये परदेशी मालमत्तेचे तपशील दिलेले नाहीत त्यांना आठवण करून देणे हा आहे. ITR भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.

Whats_app_banner