मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Facebook Meta Layoffs : ट्विटरनंतर आता मेटाचा दणका! तब्बल ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Facebook Meta Layoffs : ट्विटरनंतर आता मेटाचा दणका! तब्बल ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 09, 2022 10:17 PM IST

Meta Layoffs : फेसबुक, WhatsApp ची पॅरेंट कंपनी मेटाने आपल्या तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ट्विटरनंतर मेटाने कर्मचाऱ्यांना दणका दिला असून कंपनीच्या १८ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे.

ट्विटरनंतर आता मेटाचा दणका
ट्विटरनंतर आता मेटाचा दणका

Facebook Meta Layoffs : Facebook ची पॅरेंट कंपनी Meta ने ११ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मेटा कंपनीने बुधवारी सांगितले की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के किंवा ११, ००० हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. कंपनी वाढता खर्च व कमी होत असलेला जाहिरात बाजार समस्येचा सामना करत आहे. १८ वर्षाच्या इतिहासात कंपनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहेत. नुकतीच एलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरआणि मायक्रोसॉफ्टसह अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीने ही कारवाई केली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (mark zuckerberg) यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की मी मेटाच्या इतिहासातील काही सर्वात कठीण बदल शेअर करत आहे. मी माझ्या टीमचा आकार सुमारे १३ टक्क्यांनी कमी करण्याचा आणि आमच्या ११,००० हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “फक्त ऑनलाइन कॉमर्स पूर्वीच्या स्थितीत परतला नाही, तर मॅक्रो इकॉनॉमिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि जाहिरात सिग्नलचे नुकसान यामुळेअपेक्षित कमाई होत नाही. ते पुढे म्हणाले, "माझ्याकडून चूक झाली आणि मी त्याची जबाबदारी घेतो. मला माहित आहे की हे प्रत्येकासाठी कठीण आहे आणि मला विशेषतः प्रभावित झालेल्यांसाठी वाईट वाटते."

मार्क झुकरबर्ग म्हणाले की,आम्ही खर्चात कपात करून आणि Q1च्या माध्यमातून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं उचलत आहोत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बजेट कपातीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे डिजिटल जाहिरातींच्या कमाईत तीव्र मंदीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.

काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांनामिळणारइतके पैसे-
मेटाने सांगितले की ते प्रत्येक कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याला१६ आठवड्यांचे मूळ वेतन (मूलभूत वेतन) वेगळे पॅकेज म्हणून देतील.याशिवाय,प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी दोन अतिरिक्त आठवडे मूळ वेतनदिले जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार,आम्ही पुढील६महिन्यांसाठी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा खर्च कव्हर करू.

कंपनी देणार करिअर सपोर्ट -
कंपनी ने म्हटले की, आम्ही कामावरून काढून टाकलेल्याकर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपर्यंत करियर सपोर्ट केला जाईल. त्यामध्येअनपब्लिश्ड जॉब लीडते अर्ली एक्सेससामील आहे.

WhatsApp channel