FAB India IPO : फॅब इंडियाचा आयपीओ मागे, नेमकं कुठे बिघडलं ?
FAB India IPO : फॅशन ब्रँडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या फॅब इंडियाने आपला अंदाजे ४००० कोटींचा आयपीओ मागे घेतला आहे. भांडवल उभारणीसाठी कंपनी आता इतर पर्यायांचा विचार करणार असल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
FAB India IPO : फॅशन ब्रँडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या फॅब इंडियाने आपला अंदाजे ४००० कोटींचा आयपीओ मागे घेतला आहे. भांडवल उभारणीसाठी कंपनी आता इतर पर्यायांचा विचार करणार असल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भारतातील वस्त्रप्रावणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या फॅब इंडिया कंपनीने आपला आयपीओ बाजारात उतरवण्याची योजना थांबवली आहे. त्यांनी आपला आयपीओ मागे घेतला आहे. या आयपीओतून कंपनीला अंदाजे ४ हजार कोटींची भांडवल उभारणी करायची होती. मात्र शेअर बाजारातील सध्याच्या मोठ्या फरकांच्या चढ उतारांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, या आयपीओअंतर्गत ५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्याची योजना होती. त्याच वेळी भागधारकांकडून २.५१ कोटी शेअर्स विकले जाणार होते. कंपनी हा निधी कर्जाची परतफेड आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर रिडीम करण्यासाठी वापरणार होती.
आयपीओ मागे घेतल्याल्यानंतर फॅबइंडिया आता भांडवलासाठी इतर पर्यायांचा विचार करत आहे. सध्याच्या बाजारातील परिस्थिती आयपीओसाठी अनुकूल नसल्याने आयपीओ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. फॅबइंडियाच्या सूचीबद्ध प्रतिस्पर्ध्यांमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, वेदांत फॅशन, यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत १४ ते २१ टक्के घसरण झाली आहे. दरम्यान कंपनी भविष्यात पुन्हा आयपीओ आणण्याचा विचार करू शकते. मात्र, हे भांडवलाची आवश्यकता आणि बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
या कंपन्यांचेही आयपीओ मागे
शेअर बाजारातील अस्थिरतेत जोयालुकास, स्नॅपडील या कंपन्यांनीही मोठ्या दिमाखात आपले दाखल केलेले आयपीओ मागे घेतले आहेत.
संबंधित बातम्या
विभाग