Understaing B2B : बी२बी अर्थात, बिझनेस टू बिझनेस ही संकल्पना उद्योग जगतात बरीच प्रचलित आहे. या संकल्पनेच्या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे. बिझनेस टू बिझनेस म्हणजे एका व्यवसायाचा दुसऱ्या व्यवसायाशी असलेला परस्परसंबंध असं सोप्या भाषेत म्हणता येईल.
एक उत्पादक आणि घाऊक विक्रेता किंवा घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता यांच्यात होणाऱ्या व्यवसायाला व व्यवहाराला बिझनेस टू बिझनेस म्हणतात. उत्पादक आणि ग्राहक यांच्याऐवजी उत्पादक आणि विक्रेता यांच्यात चालणारा व्यवसाय.
बी२बी ही संकल्पना बी-टू-सी (Business To Consumer) आणि बी-टू-जी (Business To Government) या संकल्पनांपेक्षा पूर्ण वेगळी आहे.
उद्योग किंवा उत्पादक आणि घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांमध्ये होणारा व्यवसाय म्हणजे बिझनेस-टू-बिझनेस (B2B).
B2B व्यवसाय हे पुरवठा साखळीशी संबंधित असतात. या व्यवसायात एक कंपनी उत्पादन प्रक्रियेत वापरला जाणारा कच्चा माल दुसऱ्या कंपनीकडून खरेदी करते.
वाहन उद्योग कंपन्या, तसेच मालमत्ता व्यवस्थापन, हाउसकीपिंग आणि औद्योगिक क्लीनअप कंपन्यांमध्ये सामान्यत: B2B व्यवहार होतात.
काही विशिष्ट प्रकारच्या पुरवठा साखळीमध्ये बी-टू-बी व्यवहार हे सर्रास होतात. कारण कंपन्यांना त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी घटक आणि कच्चा माल खरेदी करणं आवश्यक असतं. तयार उत्पादनं नंतर बी-टू-सी मार्फत वैयक्तिक ग्राहकांपर्यंत जातात.
कम्युनिकेशनच्या संदर्भात बी-टू-बीचा संबंध येतो. या पद्धतीत विविध कंपन्यांचे कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी कनेक्ट होऊ शकतात. दोन किंवा अधिक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमधील या प्रकारच्या संवादाला B2B कम्युनिकेशन म्हणतात.
> व्यवसाय-ते-व्यवसाय व्यवहार आणि मोठी कॉर्पोरेट खाती उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांसाठी नेहमीचे असतात. आयफोनच्या उत्पादनात सॅमसंग ही कंपनी अॅपलच्या सर्वात मोठ्या पुरवठादारांपैकी एक आहे. अॅपलचे Intel, Panasonic आणि सेमीकंडक्टर प्रोड्युसर मायक्रोन टेक्नॉलॉजी सारख्या कंपन्यांशी २०२२ च्या आर्थिक वर्षात B2B संबंध आले होते.
> बी-टू-बी व्यवहार हे ऑटोमोबाईल उद्योगाचा देखील कणा आहेत. अनेक वाहनांचे घटक स्वतंत्रपणे तयार केले जातात आणि वाहन उत्पादक हे भाग ऑटोमोबाईल एकत्र करण्यासाठी खरेदी करतात. टायर, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, होसेस आणि दरवाजाचे कुलूप सामान्यत: विविध कंपन्यांद्वारे उत्पादित केले जातात आणि थेट ऑटोमोबाईल उत्पादकांना विकले जातात.
> वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणारे देखील B2B व्यवहारांमध्ये गुंतलेले असतात. प्रॉपर्टी मॅनेजमेंट, हाउसकीपिंग आणि इंडस्ट्रियल क्लीनअपमध्ये नाव असलेल्या कंपन्या अनेकदा या सेवा वैयक्तिक ग्राहकांऐवजी केवळ इतर व्यवसायांना विकतात.
संबंधित बातम्या