Stocks to buy today : शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अभ्यास, निरीक्षण, मार्केटशी संबंधित घडामोडींचं वाचन या सगळ्या गोष्टींची गरज असते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं आकर्षण सर्वांनाच असतं, पण त्याची तयारी व अभ्यास करायला सर्वांना वेळ मिळतोच असं नाही. अशा लोकांना मग वर्षानुवर्षे मार्केटमध्ये काम करणारे एक्सपर्ट्स दिशा देऊ शकतात.
ब्रोकरेज फर्म, शेअर मार्केटचे अभ्यासक वेळोवेळी गुंतवणूकदारांना काही सल्ले देत असतात. आजही काही तज्ज्ञांनी सल्ले दिले आहेत. तब्बल १३ शेअर आज खरेदी करण्याची संधी आहे, असं वेगवेगळ्या तज्ज्ञाचं मत आहे. कोणते आहेत हे शेअर पाहूया…
सिल इन्व्हेस्टमेंट्स : ७३० रुपयांना खरेदी करा. ७८५ रुपयांचं लक्ष्य ठेवा आणि ७०५ रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा.
अॅग्रो फॉस (भारत) : ४८.६१ रुपयांवर खरेदी करा. ५२ रुपयांचं टार्गेट ठेवा आणि स्टॉपलॉस ४७ रुपये ठेवायला विसरू नका.
राधिका ज्वेलटेक : १३५.७५ रुपयांना खरेदी करा. १४५ रुपयांवर टार्गेट ठेवा आणि स्टॉपलॉस १३१ रुपये ठेवा.
पेन्नार इंडस्ट्रीज : २२२ रुपयांचं टार्गेट ठेवून २०७.७३ रुपयांवर खरेदी करा आणि १९९ वर स्टॉप लॉस ठेवा.
विष्णू प्रकाश आर पुंगलिया : ३१२.९० रुपयांपर्यंत खरेदी करा, टार्गेट प्राइस ३३३ रुपये आणि स्टॉप लॉस ३०२ रुपये ठेवा.
बाटा इंडिया : हा शेअर १४६४.९५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट १५६८ रुपये ठेवून स्टॉप लॉस १४१४ रुपये लावा.
टोरंट पॉवर : १९७३.६५ रुपयांवर खरेदी करण्याची संधी आहे. २११२ रुपयांचे टार्गेट ठेवा. स्टॉपलॉस १९०५ रुपये ठेवायला विसरू नका.
अंबुजा सिमेंट ५७६ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट प्राइस ६०० रुपये असू द्या. स्टॉपलॉस ५६० रुपये ठेवा.
हिंदुस्थान कॉपर : हा शेअर ३२३ रुपयांना खरेदी करा. ३४० रुपयांचं टार्गेट ठेवा आणि ३१३ रुपये स्टॉप लॉस लावा.
सिप्ला : खरेदी १५५३ रुपये. लक्ष्य १५९० रुपये. स्टॉपलॉस १५३० रुपये.
रिलायन्स इंडस्ट्रीज : खरेदीची किंमत २७२० रुपये. टार्गेट २,८०० रुपये आणि स्टॉपलॉस २६७० रुपये.
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी : हा शेअर २३२ रुपयांना खरेदी करा. २३० रुपये टार्गेट ठेवून २२४ रुपयांवर स्टॉप लॉस लावा.
एनएमडीसी लिमिटेड : खरेदी २३१ रुपये. टार्गेट प्राइस २४२ रुपये, स्टॉपलॉस २२४ रुपये.
(इनपुट: लाइव्ह मिंट)