Multibagger stocks : टाटा मोटर्ससहित या ३ ऑटो शेअर्सवर तज्ज्ञ झाले फिदा, खरेदी करा लवकरच व्हाल मालामाल !
Multibagger stocks : जर तुम्हाला आॅटो शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर शेअर मार्केट तज्ज्ञांनी या तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Multibagger stocks : निफ्टी आॅटो इंडेक्स गुरूवारी १.०९ टक्के उसळून १६६९.६५ अंश पातळीवर पोहोचला आहे. हा ५२ आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर आह. आॅटो शेअर्समधील तेजीमुळे इंडेक्सने ३१ टक्क्यांपेक्षा अधिक उसळी घेतली आहे. त्यामुळे जर तुम्ही आॅटो शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर शेअर मार्केट तज्ज्ञांनी तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स तुम्हाला आगामी काळात मालामाल करतील असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
२२५ रुपयांवर जाणार अशोक लेलँड
या लिस्टमध्ये पहिले नाव अशोक लेलँड कंपनीचे आहे. या कंपनीचा शेअर्स पुढील काही दिवसात २२५ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सला २२५ रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला दिला आहे. हा शेअऱ गुरूवारी १८०.०५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय ३२ तज्ज्ञांपैकी २८ जणांनी खरेदी करण्याचा ३ जणांनी विक्रीचा आणि एकाने होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
टाटा मोटर्स
या यादीत दुसरे नाव टाटा मोटर्स कंपनीचे आहे. पुढील काही दिवसात हा शेअर्स ७६० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.. हा शेअर्स काल ६२४.७० रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांनी यासाठी टार्गेट प्राईस ७६० रुपये दिली आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअर्समध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक उसळी निर्माण झाली आहे.
हिरो मोटोकाॅर्प
हिरोमोटोकाॅर्पच्या शेअर्सबाबतही तज्ज्ञ बुलिश आहेत.हा शेअऱ सणांच्या दिवसात ३५३५ रुपयांवर जाऊ शकतो. गुरूवारी तो ३००० रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. गेल्या सहा महिन्यात त्यात २६टक्के उसळी निर्माण झाली आहे. ब्रोकरेज फर्मनी हा शेअऱ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
विभाग