Stocks To Buy Today : बजेटनंतर खरेदी करण्यासाठी तज्ञांनी सुचवले वेगवेगळे १० शेअर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy Today : बजेटनंतर खरेदी करण्यासाठी तज्ञांनी सुचवले वेगवेगळे १० शेअर्स

Stocks To Buy Today : बजेटनंतर खरेदी करण्यासाठी तज्ञांनी सुचवले वेगवेगळे १० शेअर्स

Feb 03, 2025 09:16 AM IST

Stocks To Buy after Budget : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराकडं सर्वांचं लक्ष आहे. तज्ञांनी आज खरेदीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत.

बजेटनंतर १० वेगवेगळ्या शेअर्सकडून तज्ञांना मोठी आशा, कोणते आहेत हे शेअर्स?
बजेटनंतर १० वेगवेगळ्या शेअर्सकडून तज्ञांना मोठी आशा, कोणते आहेत हे शेअर्स?

Stock Market News : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील कमी-जास्त तरतुदीनंतर आता गुंतवणूकदारांचं लक्ष शेअर बाजाराकडं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर बाजार तज्ञांनी खरेदीसाठी १० शेअर्सची शिफारस केली आहे.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगरिया यांनी खरेदी करण्यासाठी ५ ब्रेकआऊट शेअर्ससह ७ स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी ३ समभाग सुचवले आहे. यात कँटाबिल रिटेल, युनो मिंडा, ऑप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया, विनती ऑर्गेनिक्स, ज्योती लॅब्स, बजाज हेल्थकेअर लिमिटेड, शैली इंजिनीअरिंग प्लास्टिक लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड आणि डीएलएफ लिमिटेड यांचा समावेश आहे.

सुमित बागरिया यांचे ब्रेकआऊट स्टॉक

कॅन्टाबिल रिटेल

कॅन्टाबिल रिटेल २९३.६५ रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ३१४ रुपये ठेवून स्टॉपलॉस २८३ रुपयांवर लावा. 

युनो मिंडा

हा शेअर ९८९.८० रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट १,०५९ रुपयांचं आणि स्टॉपलॉस ९५५ रुपयांचा ठेवा.

अ‍ॅप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया

हा शेअर ३१७.१० रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ३३९ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ३०६ रुपये ठेवा.

विनती ऑर्गेनिक्स

हा शेअर १७४९.३० रुपयांना खरेदी करावा, लक्ष्य १८७२ ठेवावं आणि स्टॉपलॉस १६८८ रुपये ठेवावा.

ज्योती लॅब्स

ज्योती लॅब्स ४१५.७० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ४४५ रुपये आणि स्टॉपलॉस ४०१ रुपये ठेवा.

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

बजाज हेल्थकेअरचा शेअर ६८९.१५ रुपयांना ठेवा. स्टॉपलॉस ६६० रुपये आणि टार्गेट ७४० रुपये ठेवा.

शेली इंजिनीअरिंग प्लास्टिक लिमिटेड

शेली इंजिनीअरिंगसाठी १७३० रुपये उद्दिष्ट ठेवलं आहे. शैली इंजिनीअरिंग प्लॅस्टिक लिमिटेड १५६० च्या स्टॉप लॉससह १६१३ रुपयांना विकत घ्या.

गणेश डोंगरे यांचे शेअर्स

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ८३४ रुपये दराने खरेदी करा. ८२० रुपयांत स्टॉप लॉस लावा. 

अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड 

अ‍ॅक्सिस बँकेचा शेअर ९९८ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस ९७५ रुपये ठेवून टार्गेट प्राइस १०२५ रुपये ठेवा. 

डीएलएफ लिमिटेड

हा शेअर ७६० रुपयांना खरेदी करा. ७९५ रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी ७४५ रुपये स्टॉपलॉस ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner